KKR Vs RCB, IPL 2020: मोहम्मद सिराज याची ऐतिहासिक कामगिरी; आयपीएलच्या एकाच सामन्यात 2 मेडन ओव्हर टाकणारा ठरला पहिला खेळाडू
Mohammed Siraj (Photo Credit: IPL)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सामन्यात नाणे फेक जिंकून कोलकाता नाईट राईडर्सच्या संघाने (Royal Challenges Bangalore Vs Kolkata Knight Riders) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात बेंगलोरचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या (Mohammed Siraj) आक्रमक गोलंदाजीसमोर कोलकाताचा संघ डगमगताना दिसला आहे. या सामन्यात मोहम्मद सिराजने नव्या विक्रमाला गवसणी घातली असून कोलकाता विरुद्ध सामन्यात त्याने 2 मेडन ओव्हर केल्या आहेत. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. या सामन्यात सिराज सर्वोकृष्ट कामगिरी करुन दाखवली आहे. त्याने चार षटकात केवळ 8 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाज दीपक चहरने आतापर्यंत एकूण 2 मेडन ओव्हर केल्या आहेत. त्याने 10 मॅचमध्ये 38 ओव्हरमध्ये 2 ओव्हर मेडन केल्या आहेत. त्यानंतर या यादीत राशिद खान, नवदीप सैनी, शेल्ड्रेन कॉट्रेल शिवम मावी, कसिगो रबाडा, ट्रेंट बोल्ट,टी नटराजन, अर्शदीप सिंह यांचा क्रमांक लागतो. आयपीएलच्या तेराव्या हंगामात या सर्वांनी 2 किंवा अधिक सामने खेळून प्रत्येकी एक मेडन ओव्हर केली आहे. परंतु, मोहम्मद सिराजने एकाच सामन्यात 2 मेडन ओव्हर केली आहे. हे देखील वाचा- Ravichandran Ashwin Funny Tweet: क्रिस गेल याचे दोन्ही पाय बांधून गोलंदाजी करायला हवी; रविचंद्रन अश्विन याचे गंमतीदार ट्विट\

ट्वीट-

आयपीएलच्या तेराव्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा अव्वल स्थानी आहे. रबाडाने 10 सामन्यात गोलंदाजी करत 21 विकेट्स घेतले आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर मोहम्मद शमी आणि तिसऱ्या क्रमांकावर जसप्रीस बुमराह आहे. मोहम्मद शामीने 16 तर, बुमराहने 15 विकेट्स घेतले आहेत.