चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: PTI)

KKR vs CSK IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) बॅटिंगनंतर गोलंदाजीने आपले कौशल्य दाखवत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) 18 धावांनी धमाकेदार विजय मिळवला. चेन्नईने पहिले फलंदाजी करून दिलेल्या 221 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात केकेआर 19.1 ओव्हरमध्ये 202 धावाच करू शकली. नाईट रायडर्ससाठी त्यांचा धडाकेबाज अष्टपैलू आंद्रे रसेलने (Andre Russell) 54 धावांची रंगतदार खेळी केली, तर पॅट कमिन्स (Pat Cummins) 65 धावा करून नाबाद परतला. अशाप्रकारे संघाला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. दुसरीकडे, वानखेडेवर चेन्नईसाठी वेगवान गोलंदाज दीपक चाहर पुन्हा चेंडूने कहर केला. चाहरने सर्वाधिक 4 विकेट घेत कोलकाताच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. शिवाय, सॅम कुरन आणि लुंगी एनगीडी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (IPL 2021: MS Dhoni याच्यानंतर हे 3 बनू शकतात CSK चे कर्णधार, बॅटिंग-फिल्डिंगने गाजवत आहे मैदान)

चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाताची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये शुभमन गिल शुन्यावर चाहरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच्यापाठोपाठ नितीश राणाला तिसऱ्या ओव्हरयामध्ये चाहरने विकेटच्या मागे एमएस धोनी 9 धावांवर झेलबाद केले. चाहरने 5व्या ओव्हरमध्ये कोलकाताचा कर्णधार इयन मॉर्गनला 7 धावांवर आणि सुनील नारायणला 4 धावांवर बाद करत कोलकाताला मोठे धक्के दिले. पाठोपाठ 6व्या ओव्हरमध्ये एनगीडीने राहुल त्रिपाठीला 8 धावांवर तंबूत धाडलं. अशाप्रकारे कोलकाता संघाने 31 धावांवर पाच विकेट गमावल्या. मात्र, त्यानंतर रसेल आणि कार्तिकने धुरा आपल्या हाती घेत संघाचा डाव सावरला. दोघांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करत चेन्नई गोलंदाजांची धुलाई सुरु केली.

दोघे एकहाती संघाला विजय मिळवून देतील असेस दिसत असताना कुरनने रसेलला चकमा देत त्रिफळा उडवला. रसेलनंतर कार्तिकही वैयक्तिक 40 धावांवर बाद झाला. कार्तिकनंतर पॅट कमिन्सने आक्रमणाला सुरुवात केली. त्याने सॅम करनच्या 15व्या षटकात 24 धावा कुटल्या पण संघाला विजयीरेष ओलांडून देण्यात अपयशी ठरला. यापूर्वी चेन्नईकडून फाफ डु प्लेसिसने 95 आणि रुतूराज गायकवाडने 64 धावांची मोठी खेळी केली.