'आयपीएल मधील प्रत्येक सामन्यात भारतीय राष्ट्रगीत व्हावी' किंग्ज इलेव्हन पंजाबचे सहमालक नेस वाडिया यांचा बीसीसीआयकडे प्रस्ताव
(Photo: Facebook)

साधारणपणे आसीसीच्या (ICC) स्पर्धामध्ये राष्ट्रगीताने (Indian National Anthem) सामन्यांना सरुवात होते. मात्र, आयपीएल ही विश्वातील अव्वल स्थानाची क्रिकेट लीग असून जगभरात लोकप्रिय आहे. यामुळे आयपीएलच्या (IPL) नव्या हंगामातील प्रत्येक सामन्यात भारताच्या राष्ट्रगीताने सुरुवात करावी, असा प्रस्ताव किंग्ज इलेव्हन पंजाबसंघाचे सहमालक नेस वाडीया यांनी बीसीसीआयकडे ठेवला आहे. त्याचबरोबर आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यावर पैसे न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे वाडिया यांनी बीसीसीआयचे कौतुक केले आहे. सध्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली विराजमान झाले आहेत. तसेच वाडिया यांच्या प्रस्तावावर सौरव गांगुली काय निर्णय देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आयपीएल- 13 च्या हंगमाला एप्रिल किंवा मे महिन्यात सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या नव्या हंगामातील प्रत्येक सामन्यात भारतीय राष्ट्रगीताने सुरुवात होणार आहे, असा प्रस्ताव नेस वाडीया यांनी केला आहे. याप्रकरणी नेस वाडीया यांनी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला पत्र लिहिले असून लवकरच त्यांच्याकडून यावर सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आयपीएल ही अतिशय लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. विदेशातून देखील अनेक क्रिकेट चाहते आयपीएल सामना पाहायला येत असतात. बीसीसीआयने आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यावर पैसे खर्च न करण्याचा निर्णय घेऊन अतिशय योग्य काम केले आहे. उद्घाटन सोहळ्यात अनावश्यक खर्च केला जातो, असे मला नेहमीच वाटते. परंतु, याबरोबरच बीसीसीआयने आयपीएलच्या सामन्यांना भारताच्या राष्ट्रगीताने सुरुवात करावी, असे माझे मत आहे असे वाडिया म्हणाले. हे देखील वाचा- India Vs Bangladesh 3rd T20: रोहित शर्मा घालणार 'या' नव्या विक्रमाला गवसणी; भारतीय संघातील एकाही खेळाडूला करता आली नाही अशी कामगिरी