टी-20 विश्वचषकप 2022 ला (T20 World Cup 2022) सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहे. यामध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी (IND vs PAK) होणार आहे. हा सामना 23 ऑक्टोबरला मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे. पण या आघी क्वालीफायरल सामने खेळवले जातील. यावेळी ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात होत असून कांगारू संघ दुसऱ्यांदा टी-20 चॅम्पियन बनण्याचा प्रबळ दावेदार आहे. भारतीय संघही या स्पर्धेसाठी बऱ्याच दिवसांपासून तयारी करत असून रोहितच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताने आपल्या खेळण्याच्या शैलीतही बदल केला आहे. मात्र, जसप्रीत बुमराहसारख्या (Jasprit Bumrah) महत्त्वाच्या खेळाडूच्या दुखापतीमुळे भारतीय संघ कमकुवत झाला आहे.
विराट कोहलीने (Virat Kohli) आशिया कपमध्ये शानदार शतक झळकावले आणि आता तो त्याच्या जुन्या फार्ममध्ये परतला आहे. विराट कोहलीकडून या स्पर्धेत पुन्हा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. कोहली हा टी-20 विश्वचषकातील भारताचा सर्वात यशस्वी खेळाडू आणि जगातील सर्वात यशस्वी फलंदाज देखील आहे. या स्पर्धेत त्याचा एक विक्रम आहे. विराट हा जगातील एकमेव फलंदाज आहे जो टी-20 विश्वचषकात दोनदा ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ बनला आहे. 2014 आणि 2016 टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याने हे विजेतेपद पटकावले होते. मात्र, तो कधीही आपल्या संघाला चॅम्पियन बनवू शकला नाही.
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटची कामगिरी
विराट कोहलीने भारतासाठी आतापर्यंत चार टी-20 विश्वचषक खेळले आहेत. 2012 मध्ये तो पहिल्यांदा टी-20 वर्ल्ड कपचा भाग बनला होता. यानंतर तो 2014 आणि 2016 मध्येही खेळला आणि तिसऱ्या विश्वचषकात इतिहास रचला. 2016 मध्ये, टी-20 विश्वचषक स्पर्धेत दोनदा प्लेअर ऑफ द टूर्नामेंट जिंकणारा विराट जगातील पहिला खेळाडू ठरला. यानंतर त्याने 2021 मध्ये संघाचे नेतृत्वही केले, परंतु भारताला विजय मिळवून देऊ शकला नाही. (हे देखील वाचा: IND vs PAK T20 World Cup 2022: विराट कोहली पाकिस्तानशी टक्कर देण्यासाठी जोरदार करत आहे तयारी, व्हिडीओ पाहून बाबर आझमही होईल हैरान)
टी-20 मध्ये प्लेयर ऑफ द टूर्नांमेंट जिंकणारे प्लेयर
2007: शाहिद आफ्रिदी (12 विकेट 91 रन)
2009: तिलकर्ने दिलशान (317 रन)
2010: केविन पीटरसन (248 रन)
2012: शेन वाटसन (249 रन आणि 11 विकेट)
2014: विराट कोहली (219 रन)
2016: विराट कोहली (273 रन)
2021: डेविन वाॅर्नर (289 रन)