इंडिया प्रीमिअर लीग (Indian Premier Leaguea) स्पर्धेदरम्यान स्पॉट फिक्सिंग (Spot Fixing) प्रकरणी दोषी आढळलेला भारतीय वेगवान गोलंदाज एस श्रीसंतला Sreesanth) बीसीसीआयकडून (BCCI) दिलासा मिळाल्यानंतर आता तब्बल सात वर्षानंतर तो क्रिकेटच्या मैदानावर परतण्यास सज्ज झाला आहे. केरळ क्रिकेट असोसिएशनने (Kerala Cricket Association) रणजी संघात या खेळाडूची निवड केली आहे. श्रीसंत भारताच्या 2007 टी-20 आणि 2011 वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्य होता. 2013 आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये त्याचे नाव समोर आल्यानंतर श्रीसंतवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आजीवन बंदी घातली होती. तथापि, खेळाडूने बंदीविरूद्ध केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 2018 मध्ये केरळ उच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या आजीवन बंदीच्या आदेशास मागे टाकले. सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतची बाजू ऐकून घेऊन त्यावर 3 महिन्याच्या आत पुनर्विचार करण्याचे आदेश बीसीसीआयला दिले होते. त्यानंतर लोकपाल डी. के. जैन हे श्रीसंतबद्दल निर्णय घेतील असा निर्णय भारतीय बोर्डाने घेतला होता. (MS Dhoni वरील बेन स्टोक्सच्या टिप्पणीवर भडकला श्रीसंत, WC सामन्यात धोनीच्या फलंदाजीवर केला होता प्रश्न)
आणि आता त्या निर्णयानुसार श्रीसंत पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर येण्यास सज्ज आहे. यावेळी श्रीसंत म्हणाला, "मी स्वत:ला संधी दिल्याबद्दल मी केसीएचे खरोखर आभारी आहे. मी माझी तंदुरुस्ती परत सिद्ध करीन. सर्व वाद मिटवण्याची वेळ आली आहे." 27 कसोटी, 53 वनडे आणि 10 टी-20 सामने खेळणारा श्रीसंत अखेर ऑगस्ट 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला होता. कोविड-19 नंतर मैदानावरील प्रशिक्षणानंतरच श्रीशांतच्या फिटनेसचे मूल्यांकन करता येईल यावर जोर देऊन केरळचे प्रशिक्षक टीनू योहानन म्हणाले की केसीए त्याचे संघात स्वागत करण्यास तयार आहे.
श्रीसंतला 2013 मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी मुंबईतून अटक करण्यात आली होती. त्यानंतर बीसीसीआयने श्रीसंतवर आजीवन बंदीसह 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आजीवन बंदी घालण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे श्रीसंतने म्हटले होते. ज्यानंतर 2019 मध्ये आपण पोलिसांच्या भीतीने गुन्हा कबूल केल्याचा दावा श्रीसंतने केला होता.