कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये आहे. पार्लर आणि सलून सर्व बंद आहेत. अशा परिस्थितीत लोकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. एक तर उन्हाळी हंगाम आणि वरुन वाढणारे केस, अशा परिस्थितीत सचिन तेंडुलकरपासून विराट कोहलीपर्यंत अनेक खेळाडूंनी स्वत: दाढी आणि केस कापले आहेत. यात आता वर्ल्ड कप विजेते कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांचेही नाव सामिल झाले आहे पण,कपिल यांचा लुक या सर्वांवर भारी पडला आहे. कपिल यांनी डोक्यावरचे पूर्ण केस कापले, पण त्यांनी दाढी काढली नाही. यामुळे ते पूर्णपणे नव्या स्टाईलमध्ये दिसत आहे. कपिल यांचा लुक पाहून सर्वजण चकित झाले. नव्या लूकमुळे चाहते सोशल मीडियावर विचित्र प्रश्नही विचारत आहेत. एका यूजरने विचारले की कपिल विवियन रिचर्ड्सच्या बायोपिक करत आहेत का? तर दुसऱ्याने सांगितले की, कपिल 83 चित्रपटात सय्यद किरमानी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय चाहत्यांना कट्टप्पा बाहुबलीचीही आठवण आली. (Coronavirus: शोएब अख्तरच्या भारत-पाकिस्तान मालिकेच्या प्रस्तावावर कपिल देवची गुगली, पाहा काय म्हणाले वर्ल्ड कप विजेते कर्णधार)
आपल्या खेळण्याच्या दिवसात कर्लसाठी ओळखले जाणारे कपिल नेहमीच नवीन लूकसाठी प्रयत्न करत असतात. आणि आता लॉकडाउनने त्यांना पुन्हा एकदा त्यांना नवीन लुकसाठी प्रयोग करण्यासाठी वेळ दिला आहे. शिवाय चाहत्यांनाही तो खूप पसंत पडला आहे. पाहा कपिल याचा नवीन लुक:
सोशल मीडियावर यूजर्सच्या प्रतिक्रिया:
कपिल देव यांच्या बायोपिकचा प्रभाव
Effect of Kapil Dev's Biopic staring :
Ranveer Singh 😎😎 pic.twitter.com/GWIeXqUwHU
— Ajay Kumar 🇮🇳 (@ca_ajay_kumar) April 21, 2020
सर विवान रिचर्ड्स आणि सय्यद किरमानी यांचे मिश्रण
Kapil Dev looks like a crossover between Sir Vivan Richards and Syed Kirmani https://t.co/8TJftsxM1m
— Dr. Bewda Rick (@SavageRaptor7) April 20, 2020
विलक्षण
Legendary Kapil Dev's New Look. Wow.loved it, Great to see paji in different look.
Fantastic @therealkapildev pic.twitter.com/TCvl1Z6AHX
— Chetan Sharma (@chetans1987) April 20, 2020
कट्टप्पा बाहुबली
Legendary Kapil Dev's New Look. Wow.loved it, Great to see paji in different look.
Fantastic @therealkapildev pic.twitter.com/TCvl1Z6AHX
— Chetan Sharma (@chetans1987) April 20, 2020
दुसरीकडे, जगभरात वेगाने पसरत असलेल्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगाला घरात कैद करून टाकले आहे. अशा परिस्थितीत कंटाळा येऊ नये म्हणून खेळाडू दररोज काहीतरी नवीन करत असतात. सोशल मीडियावर लाइव्ह चॅटिंग, व्हिडिओ बनवत आहे, कुटुंबासोबत इनडोअर खेळ खेळत आहे. तर काही नवीन लुकची तयारी करत आहे.