IND vs BAN Test Series 2024: बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ 19 सप्टेंबरपासून चेन्नईत असेल. आज भारतीय संधाने सरावही केला. अनेक युवा खेळाडूंशिवाय सीनियर खेळाडूंनाही या मालिकेसाठी स्थान देण्यात आले आहे. जसप्रीत बुमराहचाही कसोटी मालिकेत समावेश करण्यात आला आहे. पहिल्या सामन्यात चेन्नईच्या मैदानावर जसप्रीत बुमराहच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला जाणार आहे. (हे देखील वाचा: IND vs BAN Test Series 2024: भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना कधी खेळला गेला, काय लागला सामन्याचा निकाल?)
जसप्रीत बुमराह रचणार इतिहास
जसप्रीत बुमराह 2024 च्या टी-20 विश्वचषकानंतर प्रथमच भारताकडून खेळणार आहे. झिम्बाब्वे आणि श्रीलंका दौऱ्यासाठी त्याला विश्रांती देण्यात आली होती. मात्र, हा वेगवान गोलंदाज बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, जसप्रीत बुमराह या मैदानावर येऊन इतिहास रचणार आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी 400 विकेट घेण्यापासून तो फक्त 3 विकेट्स दूर आहे. या सामन्यात बुमराहने केवळ 3 विकेट घेतल्यास तो इतिहास रचेल.तसेच भारताकडून 400 हून अधिक बळी घेणारा तो 10वा गोलंदाज ठरणार आहे.
जसप्रीत बुमराहची घातक गोलंदाजी
बुमराहने भारताकडून आतापर्यंत 36 कसोटी सामन्यांमध्ये 159 विकेट घेतल्या आहेत. या खेळाडूने 89 एकदिवसीय सामन्यांमध्ये 149 विकेट्स घेतल्या आहेत. तर 70 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 89 फलंदाजांना आपले बळी बनवले आहे.
फलंदाजीतही केला विक्रम
अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नावावरही कसोटी फॉर्मेटमध्ये फलंदाजीचा मोठा विक्रम आहे. बुमराह हा कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. बुमराहने 2022 साली बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध एका षटकात 35 धावा केल्या होत्या. स्टीवर्ड ब्रॉडच्या एका षटकात त्याने आपल्या बॅटने 29 धावा केल्या. याशिवाय 6 धावा अतिरिक्त होत्या. जसप्रीतने हार्दिकचा रेकॉर्ड मोडला होता. हार्दिकने 2017 मध्ये एका षटकात 26 धावा दिल्या होत्या. याआधी कपिल देव यांनी 1990 मध्ये इंग्लंडविरुद्ध एका षटकात 24 धावा दिल्या होत्या.