IND vs BAN (Photo Credit - Twitter)

मुंबई: भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांची मालिका (IND vs BAN Test Series 2024) 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये होणार आहे. या मालिकेसाठी भारत आणि बांगलादेश आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अनेक खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. बघायला गेलं तर भारत आणि बांगलादेशचा इतिहास जुना आहे. 24 वर्षांपूर्वी दोन्ही देशांदरम्यान पहिला कसोटी सामना खेळला गेला होता. (हे देखील वाचा: IND vs BAN Test Series 2024: बांगलादेशविरुद्ध गेम चेंजर ठरतील टीम इंडियाचे 'हे' तीन गोलंदाज, आपल्या घातक स्पेलने फलंदाजांना आणणार अडचणीत)

पहिला कसोटी सामना कधी खेळला गेला?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला सामना 2000/01 ढाका येथे 10 ते 13 नोव्हेंबर दरम्यान खेळला गेला. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारत या सामन्यात सहभागी झाला होता. भारताने हा सामना 9 विकेटने जिंकला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 400 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तरात भारताने 429 धावा केल्या. दुसऱ्या डावात बांगलादेशचा डाव 91 धावांत गारद झाला. भारताने हा सामना 64 धावांनी जिंकला.

हेड टू हेड आकडेवारी

भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 13 कसोटी सामने खेळले गेले आहेत. बांगलादेशला आतापर्यंत भारताविरुद्ध एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. भारताने एकूण 11 सामने जिंकले आहेत. तर 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. भारत अजूनही बांगलादेशपेक्षा बलाढ्य संघ आहे.

बांगलादेशचे मनोबल उंचावले

बांगलादेश संघाने अलीकडेच पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. पाकिस्तानच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या मालिकेत बांगलादेशने पाकिस्तानकडून 2-0 ने पराभवाची चव चाखली होती. अशा परिस्थितीत भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतही या संघाचे मनोबल उंचावले आहे. बांगलादेशला हलक्यात घेण्याची चूक रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला महागात पडू शकते.