KKR Record in MA Chidambaram Stadium: कोलकातासाठी तिसरी ट्रॉफी जिंकणे आहे अवघड, चेपॉकमधील कामगिरी आहे लाजिरवाणी

IPL 2024 Final: कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) यांच्यातील आयपीएलचा अंतिम सामना (IPL 2024 Final) रविवारी म्हणजे उद्या चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाईल. कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. त्याचवेळी, सनरायझर्स हैदराबादला (SRH) दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात, कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने सनरायझर्स हैदराबाद (SRH) वर आघाडी घेतली आहे. अंतिम फेरीत या दोन संघांच्या खेळाडूंमध्ये मोठी लढत होणार आहे. (हे देखील वाचा: KKR Stats In IPL Final: आयपीएलच्या फायनलमध्ये केकेआरचा असा आहे विक्रम, दोनवेळा मिळवले विजेतेपद; येथे पाहा आकडेवारी)

चेपॉकमध्ये केकेआरने खेळले 13 सामने 

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. या कालावधीत संघाने केवळ 4 सामने जिंकले आहेत. चेपॉकमध्ये केकेआरला 9 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मैदानावर कोलकाताची विजयाची टक्केवारी 30 च्या जवळपास आहे. चेपॉकमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 1 सामना जिंकला. तसेच, लक्ष्याचा पाठलाग करताना या संघाने 3 सामने जिंकले आहेत. एमए चिदंबरम स्टेडियमवर केकेआरची सर्वोच्च धावसंख्या 202 धावा आणि सर्वात कमी धावसंख्या 108 आहे.

आयपीएल 2024 मध्ये कोलकात्याची कामगिरी

आयपीएल 2024 च्या लीग टप्प्यातील कोलकाता नाइट रायडर्सच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, संघाने 14 पैकी 9 सामने जिंकले. संघाला 3 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले तर 2 सामने अनिर्णित राहिले. संघ 20 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्याचा निव्वळ धावगती +1.428 होता. पहिल्या क्वालिफायर सामन्यात कोलकाताने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

केकेआरने दोनवेळा कोरले आयपीएलवर नाव

कोलकाता नाईट रायडर्स हा आयपीएलमध्ये सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारा दुसरा संघ आहे. केकेआरने गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली 2012 आणि 2014 मध्ये ट्रॉफी जिंकली होती. या यादीत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत. लीगच्या इतिहासात दोन्ही संघांनी 5-5 वेळा विजेतेपद पटकावले आहे.