IPL 2022 नंतर MS Dhoni आयपीएलला करणार ‘गुड बाय’? CSK कर्णधाराच्या प्रसिद्ध शब्दात दिग्गज खेळाडूने दिले असे उत्तर
एमएस धोनी (Photo Credit: PTI)

Is MS Dhoni Retiring from IPL: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) सर्वात यशस्वी कर्णधारपैकी एमएस धोनी (MS Dhoni) यंदाच्या आयपीएलनंतर टी-20 लीगमधून निवृत्त होणार नाही असे भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांना वाटते. गावस्कर यांच्या म्हणण्यानुसार धोनीमध्ये पुरेसा खेळ शिल्लक आहे. गावस्कर म्हणाले की, माजी भारतीय कर्णधार अजूनही आयपीएल (IPL) 2023 खेळण्यासाठी पुरेसा फिट आहे. फ्रँचायझीचे नेतृत्व करणे असो, विश्वासार्ह यष्टिरक्षक असो किंवा फिनिशर, धोनी अजूनही चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघासाठी सर्वोत्तम खेळ करत आहे. 40 वर्षीय खेळाडू आपले भविष्यातील पर्याय खुले ठेवत असताना जेव्हा भारताचे महान खेळाडू सुनील गावस्कर यांना विचारले गेले की धोनी सध्याच्या आयपीएल मोहिमेनंतर निवृत्त होईल का, तेव्हा त्याने फक्त दोन शब्दांत उत्तर दिले. (IPL 2022, CSK vs MI: 9 वर्षांनंतर तेच मैदान, तेच प्रतिस्पर्धी; मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जने केली इतिहासाची पुनरावृत्ती केली)

स्टार स्पोर्ट्सवरील चॅटमध्ये गावसकर यांना धोनीच्या सातत्यबाबत सर्वांत महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. मूळ लिटल मास्टर खूप आशावादी दिसले आणि त्यांनी MSD च्या निवृत्तीबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर प्रसिद्ध 'निश्चितपणे नाही' अशा शब्दात दिले. गावसकर वाहिनीला म्हणाले, “म्हणजे, तो ज्या पद्धतीने खेळला आहे ते पहा. तो स्पष्टपणे दाखवत आहे की तो खेळाबद्दल खूप उत्सुक आहे, अजूनही उत्साही आहे,” गावस्कर यांनी पुढे म्हटले. “मैदानावर, ते बरेच काही सांगणारे होते. तो एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत धावत होता, याचा अर्थ तो उत्सुक होता. सुरुवातीच्या 2 किंवा 3 विकेट पडल्यावर त्याला संधीची जाणीव होते. आम्ही त्याला हे नियमितपणे करताना पाहिले आहे. ज्याचा अर्थ ‘नक्कीच नाही’ असा आहे. होय (तो पुढे खेळत राहील), 2022 मध्ये जेव्हा त्याला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने तेच सांगितले," गावस्कर म्हणाले. धोनीने 2020 मध्ये पहिल्यांदा ‘Definitely Not’ असे एका शब्दात उत्तर दिले होते जेव्हा हर्षा भोगलेने त्याला विचारले होते की CSK ची मोहीम त्याची शेवटची आहे का?

तसेच या मोसमात जेव्हा धोनीने जडेजाकडून CSK चे कर्णधारपद स्वीकारले तेव्हा त्याला पुन्हा त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल विचारण्यात आले. तेव्हा त्याने म्हटले होते की, “तुम्ही मला पिवळ्या जर्सीमध्ये [पुढच्या वर्षी] नक्कीच पहाल, मग ही पिवळी जर्सी असो किंवा इतर काही पिवळी जर्सी, ती वेगळी गोष्ट आहे.” गुरुवारी मुंबई इंडियन्स (MI) कडून झालेल्या पराभवानंतर सुपर किंग्ज आयपीएल 2022 मधून बाहेर पडले. धोनीने हंगामाच्या सुरुवातीपूर्वी सीएसकेचे कर्णधारपद सोडले आणि रवींद्र जडेजाकडे संघाची कमान सोपवली, पण जडेजाही पदावरून पायउतार झाल्यावर धोनी पुन्हा कर्णधार म्हणून परतला. मुंबईविरुद्ध 33 चेंडूत नाबाद 36 धावा करूनही यलो आर्मीला 97 धावांत गारद झाली. प्रत्युत्तरात, मुंबईने 14.5 षटकांत 103 धावा करून सुपर किंग्जला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर काढले.