
जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) दहशतवादी हल्ला होण्याच्या शक्यतेने घाटीमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. शिवाय अमरनाथ यात्रा (Amanath Yatra) देखील रद्द करण्यात आली आहे आणि यात्रेकरू, पर्यटकांना जम्- काश्मीरमधून परत जाण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान, जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनने (JKCA) भारताचा क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) आणि त्याच्यासह 100 हून अधिक खेळाडूंना काश्मीर सोडण्यास सांगितलं आहे. इरफान आणि त्याच् सपोर्ट स्टाफमधील इतर लोक आजच तिथून परत येतील. आणि काश्मीरमधील लोकांना तिथेच थांबण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आला आहे.
याबाबत जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बुखारी यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, कँपमध्ये असलेल्या जवळपास 102 खेळाडूंना परत पाठवण्यात आले आहे. इथली परिस्थिती तणावपूर्ण असून काय चाललं आहे हे कळत नाही. इथे होणाऱ्या क्रिकेट स्पर्धा देखील पुढे ढकलल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर स्पर्धा घेतली जाणार आहे. इरफानने याबाबत ट्विट करत आपली भावना व्यक्त केली आहे. इरफानने लिहिले, "माझे मन आणि हृदय काश्मीरमध्ये भारतीय सैन्य आणि काश्मिरी बंधू-भगिनींसह राहिले आहे.'
Both, my mind & heart are still back in Kashmir with Indian army & Indian Kashmiri brothers and sisters... #Kashmir #KashmirUnderThreat
— Irfan Pathan (@IrfanPathan) August 4, 2019
ऑगस्ट महिन्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक क्रिकेट सामने सुरू होणार होते. जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशननं राज्यातील क्रिकेटर्सच्या निवडीसाठी आणि प्रशिक्षणासाठी शिबिर भरवण्यात आले होते. यामध्ये अंडर-23 आणि वरिष्ठ गटातील खेळाडूंचे आठ संघ तयार करण्यात आले होते. शिवाय 17 ऑगस्टपासून दुलीप ट्रॉफीला देखील सुरुवात होणार आहे. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफी, देवधर ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी होणार आहे. रणजी ट्रॉफीच्या लीग राउंडला 9 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. यातील काही सामने जम्मू काश्मीरमध्ये होणार होते.