भारतीय संघाचा माजी स्टार अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण (Irfan Pathan) आणि त्याच्या कुटुंबीयांना विमानतळावर अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यांना वाईट वागणूक मिळाली. इरफान आणि त्याच्या कुटुंबीयांना विस्ताराच्या चेक-इन काउंटरवर सुमारे दीड तास उभे ठेवण्यात आले. खुद्द इरफान पठाणने हे आरोप केले आहेत. इरफानने सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने याचा खुलासा केला आहे. इरफानने सांगितले की, यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि दोन मुले होती. वास्तविक, इरफान पठाण बुधवारी (24 ऑगस्ट) कुटुंबासह दुबईला (Dubai) जाण्यासाठी मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) पोहोचला होता. येथून त्याला उड्डाण करायचे होते. यादरम्यान त्यांना विमानतळावर वाईट वागणूक देण्यात आली. इरफान पठाणचा आशिया कप 2022 च्या (Asia Cup 2022) कॉमेंट्री पॅनलमध्ये समावेश आहे. 27 ऑगस्टपासून यूएईमध्ये (UAE) ही स्पर्धा सुरू होत आहे. यासाठी इरफान दुबईला रवाना झाला आहे.
'त्याची पत्नी आणि दोन मुलही होती सोबत'
ट्विटरवर पोस्ट शेअर करताना इरफान पठाणने लिहिले की, 'आज (बुधवार) मी मुंबईहून दुबई विस्तारा फ्लाइट UK-201 ला निघालो होतो. दरम्यान, चेक-इन काउंटरवर माझ्याशी वाईट वागणूक देण्यात आली. विस्ताराने माझ्या कन्फर्म तिकिटात फेरफार केला. ही समस्या सोडवण्यासाठी मला दीड तास काउंटरवर उभे राहावे लागले. माझ्यासोबत माझी पत्नी आणि दोन मुलही होती. (हे देखील वाचा: Asia Cup 2022: व्हीव्हीएस लक्ष्मण यांची भारतीय संघाचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती)
Tweet
Dear Mr. Pathan, we are very concerned to hear about the experience you had and are investigating the incident on priority. We request you to please share your contact details and a convenient time to connect with you via DM. ~Team Vistara https://t.co/IaDysdZALS
— Vistara (@airvistara) August 24, 2022
अनेक प्रवाशांना अशा समस्यांचा करावा लागला सामना
माजी अष्टपैलू खेळाडू म्हणाला, 'ग्राउंड स्टाफ खूप बहाणा करत होता आणि त्यांचे वर्तनही खूप वाईट होते. माझ्याशिवाय तिथे अनेक प्रवासी होते, ज्यांना अशाच समस्यांचा सामना करावा लागत होता. मला समजत नाही की त्यांनी फ्लाइटची ओव्हरसेल्ड कशी केली आणि व्यवस्थापनाने ते कसे मंजूर केले? मी प्राधिकरणाला विनंती करतो की या प्रकरणी तातडीने काही पावले उचलावीत जेणेकरुन मला आलेला अनुभव इतर कुणालाही येऊ नये. इरफान पठाणने या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आशा आहे की तुम्ही याकडे लक्ष द्याल आणि एअर विस्तारामध्ये सुधारणा कराल.' मात्र, नंतर एअरलाइन्सने ट्विट करून पठाणच्या या वागणुकीबद्दल चिंता व्यक्त केली.