Photo Credit- X

India Women's National Cricket Team vs Ireland Women's National Cricket Team Match Scorecard: भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND W vs IRE W) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना राजकोटमध्ये सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर (Saurashtra Cricket Association Stadium) खेळला जात आहे. आयर्लंड महिला संघाची कर्णधार गॅबी लुईसने (Gaby Lewis)नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे भारतीय महिला संघ प्रथम गोलंदाजी करत आहे.  आयर्लंड महिला संघाची कर्णधार गॅबी लुईसने दमदार अर्धशतकी खेळी खेळली. सामन्याची माहिती लिहिताना तिने 90 चेंडूत 65 धाव्या केल्या होत्या. येथे पहा सामन्याचे लाईव्ह स्कोअर कार्ड

 गॅबी लुईसची अर्धशतकी खेळी

एकीकडे सर्व खेळाडू लवकर पव्हेलीयमनध्ये जात असताना दुसरीकडे गॅबीकडून खेळ सावरण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या आयर्लंड महिला क्रिकेट संघाला चौथा धक्का बसला आहे. प्रिया मीश्राच्या बॉलवर लॉरा डेलानी शून्यावर बाद झाली. सारा फोर्ब्स, उना रेमंड-होई,ओर्ला प्रेंडरगास्ट, लॉरा डेलानी या धावबाद झाल्या आहे. बातमी लिहिताना, आयर्लंडचा स्कोअर 101 (4 विकेट, 25.3 षटके) होता. (India Women vs Ireland Women, 1st ODI Match Live Streaming In India: टीम इंडियाविरुद्ध आयर्लंड महिला आमनेसामने; कधी, कुठे आणि कसा पहाल सामना?)

चार बाद

भारताने गोलंदाजी करताना तितास साधूने सारा फोर्ब्सला बाद केले. तिने 15 चेंडूत अवघ्या 9 धावा केल्या. त्यानंतर आर्यलंडला दुसरा धक्का जेमिमा रॉड्रिग्जच्या गोलंदाजीवर बसला. जेमिमा रॉड्रिग्जने गोलंदाजी करत उना रेमंड-होईला 8.3 षटकात 5 धावांवर बाद केले. त्यानंतर रिचा घोषने ओर्ला प्रेंडरगास्टला बाद केले. 13.2 षटकांत 56/3 बाद झाले. ओर्ला प्रेंडरगास्टला 10 चेंडूत 9 धावा करता आल्या. त्यानंतर प्रिया मीश्राच्या बॉलवर लॉरा डेलानी शून्यावर बाद झाली.

दोन्ही संघांतील खेळाडू

टीम इंडिया: स्मृती मानधना (कर्णधार), प्रतिका रावल, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, मिन्नू मणी, रिचा घोष, तनुजा कंवर, प्रिया मिश्रा, तितस साधू, साईमा ठाकोर.

आयर्लंड: गॅबी लुईस (कर्णधार), सारा फोर्ब्स, लॉरा डेलानी, लिया पॉल, ओर्ला प्रेंडरगास्ट, उना रेमंड हॉय, अर्लीन केली, जॉर्जिना डेम्पसे, एमी मॅग्वायर, फ्रेया सार्जंट, अलाना डालझेल.