IPL Mini Auction 2023(Photo Credit - File)
IPL 2023 Auction: आयपीएल 2023 च्या (IPL 2023) लिलावाचा टप्पा लवकरच निश्चित होणार आहे. कोचीमधील सर्व 10 फ्रँचायझी त्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी रिंगणात असतील. यावेळी आयपीएलचे प्रसारण जिओ सिनेमावर होणार आहे. ख्रिस गेल आणि सुरेश रैनासारखे दिग्गज टीव्ही स्टुडिओमध्ये बसून तुम्हाला लिलावाशी संबंधित पैलू समजावून सांगतील. यावेळी एकूण 991 क्रिकेटपटूंनी आयपीएलमध्ये खेळण्यासाठी नोंदणी केली होती, त्यापैकी फक्त 405 क्रिकेटपटूंची बीसीसीआयने लिलावाचा भाग होण्यासाठी निवड केली आहे. या मिनी लिलावादरम्यान, या 405 क्रिकेटपटूंपैकी फक्त 67 फ्रँचायझीवर सट्टा लावू शकतात. (हे देखील वाचा: IPL Auction 2023: 'या' 10 खेळाडूंवर राहणार सर्वांच्या नजरा, लिलावात मिळू शकते बक्कळ पैसा)
आयपीएल 2023 साठी मिनी लिलाव कधी आणि कुठे होणार आहे?
आयपीएल 2023 साठी मिनी लिलाव गुरुवार, 23 डिसेंबर रोजी कोची येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आयोजित केला जाईल.
आयपीएल 2023 चा मिनी लिलाव चाहते कोणत्या वेळेपासून पाहू शकतात?
आयपीएल 2023 साठी मिनी लिलाव दुपारी 2.30 वाजेपासून टीव्हीवर पाहता येईल.
आयपीएल 2023 साठी मिनी लिलाव कोणत्या चॅनलवर टीव्हीवर प्रसारित होईल?
आयपीएल 2023 साठी मिनी लिलावाचे प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओ सिनेमावर पाहता येईल. तसेच मिनी लिलावाचे थेट प्रक्षेपण डिस्ने हॉटस्टार आणि जिओ सिनेमाद्वारे मोबाईलवर पाहता येईल.
आयपीएल 2023 साठी मिनी लिलाव किती भाषांमध्ये प्रसारित केला जाईल?

Jio Cinema आयपीएल 2023 साठी मिनी लिलावचे प्रसारण हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त तमिळ, तेलगू, मल्याळम आणि बंगाली भाषांमध्ये पाहता येईल.