IPL 2025 Mega Auction Live Streaming: ज्या क्षणाची क्रिकेट चाहते वाट पाहत होते तो क्षण काही तासांनंतर संपणार आहे. आयपीएल 2025 मेगा लिलावाचा (IPL 2025 Mega Auction) आज पहिला दिवस आहे. सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात आज भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत, चाहत्यांना हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की ते मेगा लिलावाचे थेट प्रेक्षेपण कुठे विनामूल्य पाहू शकतात. कारण चाहते Hotstar, StarSports आणि Sony वर मेगा लिलावाचे मोफत लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकणार नाहीत. तर 'या' ओटीटी वर पाहता येणार आहे. (हे देखील वाचा: IPL Mega Auction 2025: मेगा लिलावात 'या' खेळाडूंवर लावली जाऊ शकते सर्वात मोठी बोली, मोड शकतात आधीचे सर्व रेकॉर्ड)
तुम्ही येथे पाहू शकता मेगा लिलाव विनामूल्य
सर्व 10 फ्रँचायझी आयपीएल 2025 मेगा लिलावात खेळाडूंवर बोली लावण्यासाठी तयार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लिलावाचे पहिले सत्र दुपारी 3:30 ते 5 वाजेपर्यंत चालू शकते. त्यानंतर 45 मिनिटांचा ब्रेक असेल. याशिवाय रात्री 10 वाजेपर्यंत मेगा लिलाव सुरू राहण्याची शक्यता आहे. हा मेगा इव्हेंट तुम्ही Hotstar, Sony किंवा Star Sports वर नाही तर JioCinema ॲपवर मोफत पाहू शकता.
Time. Date. Details of marquee player sets
🔗 https://t.co/TDFGIn47Co pic.twitter.com/WNS27XOveH
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 24, 2024
'या' खेळाडूंवर असेल सर्वाच्या नजरा
यावेळी मेगा लिलावात 577 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. चाहत्यांच्या नजरा केएल राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि अर्शदीप सिंग या खेळाडूंवर असणार आहेत. यावेळी मेगा लिलावाचा विक्रम मोडला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेगा लिलावात ऋषभ पंतवर सर्वात मोठी बोली लावली जाऊ शकते. पंजाब किंग्ज, आरसीबी आणि केकेआर सारखे संघ या खेळाडूला लक्ष्य करताना दिसतात.
पंजाब किंग्जकडे जास्त पैसे
यावेळी मेगा लिलावात पंजाब किंग्ज सर्वात जास्त पैसे घेवुन लिलावात उतरणार आहे. पंजाब किंग्सच्या पर्समध्ये जवळपास 110 कोटी रुपये शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत, या फ्रँचायझीला मेगा लिलावात अनेक मोठे खेळाडू विकत घेऊन नवीन हंगामासाठी आपला मजबूत संघ तयार करायचा आहे. मेगा लिलावापूर्वी पंजाब किंग्जने केवळ दोन खेळाडूंना कायम ठेवले होते.