IPL Chinese Sponsor: चिनी कंपनी VIVOला आयपीएल टायटल प्रायोजक म्हणून रिटेन केल्याचा CAITने दर्शवला विरोध, बंदी घालण्यासाठी गृह आणि परराष्ट्रमंत्र्यांना लिहिले पत्र
IPL Trophy  (Photo Credit: Twitter)

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापारी संस्थेने बीसीसीआयच्या (BCCI) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आगामी हंगामासाठी चिनी कंपनी VIVO ला शीर्षक प्रायोजक म्हणून कायम ठेवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. द प्रिंटच्या वृत्तानुसार, या व्यापारी संघटनेने गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांना पत्र लिहून या कार्यक्रमास परवानगी न देण्यास केंद्र सरकारला विनंती केली आहे. संयुक्त अरब इमारती येथे 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान आयपीएलचे (IPL) आयोजन होणार असल्याची बीसीसीआयने यापूर्वी घोषणा केली. रविवारी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने (IPL Governing Council) कार्यक्रमाच्या तारखांना दुजोरा दिला आणि बोर्ड आपले सर्व प्रायोजक कायम ठेवेल असेही सांगितले. अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात CAITचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भारतीया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी म्हटले की बीसीसीआयची ही कारवाई देशात कोरोना रोखण्याच्या सरकारच्या धोरणे विरोधात असेल. (IPL 2020 Update: यंदाचे आयपीएल 13 असणार जरा हटके; 24-खेळाडूंचा संघ, क्रिकेटरला कोविड-19 झाल्यास मिळणार सब्स्टीट्यूट)

अशा वेळी जेव्हा भारत आणि जगभरातील देश कोरोनाविरूद्ध लढा देत आहेत, बीसीसीआयचा हा निर्णय कोरोनाला चालना देणारा ठरू शकतो असे भारतीया यांनी पत्रात म्हटले. जून महिन्यात चीनच्या भारतीय सीमेवरील हल्ल्यामुळे चीनच्या विरोधात भारतीय लोकांच्या भावना मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याचे पत्रात म्हटले आणि पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वात, केंद्र सरकार 'लोकल पर वोकल' आणि आत्मनिर्भर भारतसाठीचे आवाहन प्रत्यक्षात येण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत, अशा परिस्थितीत बीसीसीआयचा निर्णय सरकारच्या या धोरणाच्या विरोधात आहे. CAIT 10 जूनपासून देशातील चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी मोहीम राबवित आहे.

यंदा इंडियन प्रीमियर लीग युएईमध्ये होणार आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. यावेळी 10 दिवस डबल-हेडर खेळले जातील. यंदा आयपीएल सामन्यांच्या वेळांमध्येही बदल करण्यात आला आहे. दुपारचे सामने 3.30 तर रात्रीचे सामने 7.30 वाजता सुरु होतील. रविवारी बीसीसीआय गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत सर्व निर्णय घेण्यात आले.