Mohammed Siraj (Image Credits - Twitter/@RCBTweets)

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने BCCI च्या लाचलुचपत प्रतिबंधक युनिटला (ACU) एका अज्ञात व्यक्तीकडून "भ्रष्ट संपर्क" नोंदवला आहे. या व्यक्तीने मागील IPL सामन्यात कथीतरित्या भरपूर पैसे गमावले आहेत. आता त्याला सिराज याच्या संघाबद्दल आतल्या बातम्या पाहिजे होत्या. मोहम्मद सिराज याला अज्ञाताकडून फोन आला आणि प्रकाराचा उलघडा झाला. मेहम्मद सिराज याने ही बाब तातडीने एसीयू अधिकाऱ्यांना कळवली. या नंतर आयपीएल 2023 मध्ये मॅच फिक्सींग रॅकेट सक्रीय झाले आहे का? अशी शंका घेतली जात आहे.

सांगितले जात आहे की, "सिराज याच्याशी संपर्क साधणारा व्यक्ती बुकी नव्हता. तो एक हैदराबादचा ड्रायव्हर आहे. ज्याला सामन्यांवर सट्टे लावण्याचे व्यसन आहे. खेळातील सट्टेबाजीवर त्याने खूप पैसे गमावले होते आणि आतल्या माहितीसाठी त्याने सिराजशी संपर्क साधला होता. (हेही वाचा, दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंच्या सामानांची चोरी, दिल्ली विमानतळावरची घटना)

आलेल्या फोनबद्दल सिराजने ताबडतोप माहिती दिली. प्राप्त माहितीनुसार तपास करुन संबंधित यंत्रणांनी फोन करणाऱ्या व्यक्तीला पकडले आहे. त्याच्याकडे चौकशी सुरु असून अधिक तपशीलाची प्रतक्षा आहे, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले.

सीएसके संघाचे माजी प्रमुख गुरुनाथ मयप्पन यांच्यासह एस श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांना स्पॉट-फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याने, बीसीसीआयने एसीयूचे काम वाढवले आहे. त्यामुळे प्रत्येक टीममध्ये एक समर्पित ACU अधिकारी असतो जो त्याच हॉटेलमध्ये राहतो आणि त्याची सर्व बाबींवर बारीक नजर असते.