IPL 2022: नवीन संघाच्या प्रवेशाने बदलणार आयपीएलचे रंग रूप; 74 सामन्यांत संघात होणार चुरशीची लढत, अधिक खेळाडू बनणार करोडपती; वाचा सविस्तर
आयपीएल 2020 फायनल ट्रॉफी (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) लखनौ आणि अहमदाबादच्या रूपात दोन नवीन संघांची एन्ट्री झाली आहे. यासह आता आयपीएल (IPL) 2022 मध्ये 10 संघ चुरशीची टक्कर पाहायला मिळणार आहे. नवीन संघांच्या आगमनाने स्पर्धेत नवे बदल पाहायला मिळतील. सामन्यांची संख्या देखील पूर्वीपेक्षा जास्त असेल आणि स्वरूप देखील बदलू शकते. यासोबतच खेळाडूंच्या लिलावात क्रिकेट विश्वातील अनेक स्टार खेळाडूंवर पैशाचा वर्षाव होईल. चला तर मग जाणून घेऊया IPL 2022 मधून स्पर्धेत कोणते बदल पाहायला मिळतील. 10 नवीन संघांमुळे आता आयपीएलमध्ये एकूण 74 सामने खेळले जातील. आयपीएल 2021 मध्ये फक्त 60 सामने खेळले गेले होते. म्हणजेच पुढील मोसमापेक्षा 14 सामने जास्त खेळले जातील. (IPL New Teams Auction: संजीव गोयंका यांनी 7,090 कोटींना विकत घेतला लखनौ संघ, तर 5,600 कोटींना CVC Capital ने खरेदी केला अहमदाबाद संघ)

उल्लेखनीय आहे की आयपीएल 2011 मध्येही 74 सामने खेळले गेले होते, तेव्हाही आयपीएलमध्ये 10 संघ होते. आयपीएल 2012 आणि 2013 मध्ये प्रत्येकी नऊ संघ होते आणि तेव्हा एकूण 76 सामने खेळले गेले. अशा स्थितीत तब्बल आठ वर्षांनंतर आयपीएलमधील सामन्यांची संख्या पुन्हा वाढणार आहे. आणि यामुळे स्पर्धेचा कालावधी वाढू शकतो. अशा स्थितीत बीसीसीआयला (BCCI)  कॅलेंडरमधील आणखी काही दिवस आयपीएलसाठी बुक करावे लागणार आहेत. तथापि प्रत्येक संघाला 14 सामने खेळावे लागणार आहेत. यापैकी सात घरात आणि सात बाहेरील मैदानावर खेळले जातील. यापूर्वी 2011 मध्ये प्रत्येकी पाच संघांचे दोन गट तयार करण्यात आले होते. IPL 2022 बाबत गव्हर्निंग कौन्सिलने अद्याप रिटेन्शन पॉलिसी जारी केलेली नाही.

मात्र मेगा लिलावादरम्यान राइट टू मॅच कार्ड नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्येक संघाला जास्तीत जास्त चार खेळाडू कायम ठेवण्याची मुभा असेल असे मानले जात आहे. त्यापैकी किती देशी असतील आणि किती विदेशी असतील यावर अद्याप निर्णय घेणे शिल्लक आहे. लिलावापूर्वी दोन नवीन संघ चार खेळाडूंना सोबत घेऊन जाऊ शकतील. अशा स्थितीत लिलावात सर्व संघ बरोबरीत असतील. दरम्यान, BCCI ने यशस्वी बोलीदारांच्या घोषणा केल्यानुसार (निश्चित कागदपत्रे आणि इतर औपचारिकता पूर्ण केल्याच्या अधीन): RPSG Ventures Ltd. - लखनौ (7,090 कोटी रुपये) आणि Irelia Company Pte Ltd (CVC Capital Partners) - अहमदाबाद (5,625 कोटी रुपये) संघ पुढी वर्षांपासून आयपीएलमध्ये आपला दम दाखवतील.