बीसीसीआयने आयपीएलच्या दोन नवीन संघांची घोषणा केली आहे. 2022 मध्ये अहमदाबाद आणि लखनौ असे दोन नवीन संघ आयपीएलमध्ये खेळतील. सोमवारी दुबईत दोन नवीन संघांसाठी बोली लावण्यात आली. संजीव गोयंका यांच्या मालकीच्या आरपीएसजी ग्रुपने सर्वाधिक  7090 कोटी रुपयांची बोली लावून लखनऊ फ्रँचायझी खरेदी केली आहे. यासह सीव्हीसी कॅपिटल्स ग्रुपने अहमदाबाद फ्रँचायझी 5625 कोटींना खरेदी केली आहे. बीसीसीआयला दोन नवीन आयपीएल संघांकडून सुमारे 7 ते 10 हजार कोटींची कमाई अपेक्षित होती, परंतु ही कमाई 12 हजार कोटींच्या पुढे गेली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)