IPL 2022: विराट कोहलीने सर्वात लाजिरवाणे शतक झळकावले, 29 महिन्यांपासून शतकाच्या दुष्काळात गेले 100 सामने; आकडेवारीत पहा ‘विराट’ कामगिरीचे हायलाईट्स
विराट कोहली (Photo Credit: PTI)

IPL 2022: टीम इंडिया (Team India) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) बॅटने सध्या खराब फॉर्मशी झुंज देत आहे. मंगळवारी लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्धच्या सामन्यात विराट पुन्हा एकदा खाते न उघडता बाद झाला आणि यादरम्यान त्याने आपल्या कारकिर्दीत एक लाजिरवाणे शतक झळकावले. कोल्ही आयपीएलच्या (IPL) इतिहासात आतापर्यंत 214 सामन्यांमध्ये पाच शतके आणि 42 अर्धशतकांसह 6402 धावा करणारा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तसेच क्रिकेट इतिहासात 23,650 धावांसह फलंदाजांच्या यादीत तो सातव्या स्थानावर आहे. या यादीत सचिन तेंडुलकर सर्व फॉरमॅटमध्ये एकूण 34,357 धावांसह आघाडीवर आहे. (Ravi Shastri on Virat Kohli: बस झालं...‘विराट कोहली खूप खचला आहे’, शास्त्री गुरुजींचं मोठं वक्तव्य)

लखनौच्या दुष्मंथा चमीराच्या बॉलवर विराट 2017 नंतर आयपीएलमध्ये खातेही उघडू शकला नाही, तर शतकी दुष्काळाची ही त्याची 100 वा डाव होता. 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध पिंक बॉल कसोटीत शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीने आयपीएल, कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा एकूण 100 डाव खेळले आहेत, पण त्याचा शतकाचा दुष्काळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. तब्ब्ल दोन वर्षांपूर्वीच्या शतकी खेळीनंतर विराट बाबत बोलायचे तर कोहलीने त्याच्या शेवटच्या शतकापासून 17 कसोटी, 21 एकदिवसीय, 25 टी-20 आणि 37 आयपीएल सामने खेळले आहेत. यादरम्यान अनेकवेळा त्याने अर्धशतकी धावांचा टप्पा ओलांडला, मात्र त्याला त्याचे शतकात रूपांतर करता आलेले नाही. इतकंच नाही दुष्काळात तेरावा म्हणजे आयपीएलमध्ये दोनदा धावबाद झाला आहे.

दरम्यान विराटने अलीकडेच कसोटी कर्णधारपद सोडले आणि त्याच्या जागी रोहित शर्माची सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. विराटचा सडपातळ फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे, विशेषत: टी-20 विश्वचषक स्पर्धेत. संघर्ष करणारा कोहली या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियात खेळणे टीम इंडियाला परवडणार नाही. मंगळवारी लखनौविरुद्ध विराटने आपल्या ताज्या अपयशाकडे सोशल मीडियावर बरेच लक्ष वेधले आणि अनेक नेटकऱ्यांनी त्याच्या बाजूने तर काहींनी त्याच्या विरोधात पोस्ट शेअर केल्या. आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत झालेल्या सात सामन्यांमध्ये कोहलीने 19.83 च्या सरासरीने 48 च्या सर्वोच्च स्कोअरसह केवळ 119 धावा केल्या आहेत.