IPL 2022 पूर्वी सनरायझर्स हैदराबादचा धमाका, ब्रायन लारा बनले फलंदाजी प्रशिक्षक, तर डेल स्टेनला मिळाली मोठी जबाबदारी
डेल स्टेन आणि ब्रायन लारा (Photo Credit: Instagram, Facebook)

IPL 2022: सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) आयपीएल 2022 पूर्वी व्यवस्थापन आणि सपोर्ट स्टाफची मोठी घोषणा केली आहे. या अंतर्गत फ्रँचायझीचे मुख्य प्रशिक्षक तसेच फलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक, वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. सनरायझर्स हैदराबादने ब्रायन लारा (Brian Lara), डेल स्टेन (Dale Steyn), टॉम मूडी, मुथय्या मुरलीधरन, सायमन कॅटिच आणि हेमांग बदानी या दिग्गज खेळाडूंची संघातील मोठ्या  पदांवर नियुक्ती केली आहे. यापैकी मूडी आणि मुरलीधरन हे आधीच संघासोबत कार्यरत होते. मूडी आयपीएल (IPL) 2021 मध्ये संघ संचालक होते. यापूर्वीही ते संघाचे प्रशिक्षक देखील होते. त्यानंतर ट्रेव्हर बेलिस हे प्रशिक्षक झाले आणि आता त्यांची जागा मूडीने घेतली आहे. मूडी यांच्या प्रशिक्षणात सनरायझर्स पाच वेळा आयपीएलच्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. तसेच 2016 मध्ये विजेतेपद देखील पटकावले होते. याशिवाय मुरली आयपीएलमध्ये CSK, RCB सारख्या संघात राहिला आहे. (IPL 2022 Mega Auction: आयपीएल मेगा लिलावासाठी नवीन तारखा जाहीर, आता ‘या’ दिवशी लागणार खेळाडूंची बोली)

उल्लेखनीय आहे की 2022 हंगामापूर्वी हैदराबादच्या प्रशिक्षण विभागात आता ब्रायन लारा, देल स्टेन आणि हेमांग बदानी अशा दिग्गज खेळाडूंची एन्ट्री झाली आहे. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ब्रायन लारा याची हैदराबादने रणनीतिक सल्लागार आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तो प्रथमच आयपीएल संघाच्या सपोर्ट स्टाफशी जोडला गेला आहे. लाराच्या नावावर 22 हजार आंतरराष्ट्रीय धावा आहेत. सनरायझर्सने भारताचा माजी क्रिकेटपटू हेमांग बदानी यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि स्काऊट म्हणून नियुक्ती केली आहे. बदानी यांनी तीन वेळा तामिळनाडू प्रीमियर लीग विजेत्या चेपॉक सुपर गिलीज सोबत प्रशिक्षक म्हणून काम केले आहेत. त्याने भारतासाठी चार कसोटी आणि 40 वनडे सामनेही खेळले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्येही तो एक यशस्वी खेळाडूंपैकी आहेत.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन सायमन कॅटिचला SRH चे सहाय्यक प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. यांनी यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे मुख्य प्रशिक्षक म्हणून आयपीएलमध्ये काम केले आहेत. याशिवाय त्यांच्याकडे खेळाडू म्हणूनही आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर 56 कसोटी, 45 वनडे सामने खेळले आहेत. वैयक्तिक कारणांमुळे ऑगस्ट 2021 मध्ये त्यांनी आरसीबीच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. तसेच हैदराबादने दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनला वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. स्टेनने आयपीएलमध्ये बंगलोर, डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबादचा समावेश आहे.