सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: PTI)

IPL 2022, RCB vs SRH Match 54: सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात आयपीएल (IPL) 2022 चा 54 वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस ही जोडी आरसीबीच्या (RCB) डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरली तेव्हा विल्यमसनने सुचितच्या (J Suchith) हातात चेंडू सोपवला. या डावखुऱ्या ऑफस्पिनरने पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीला रोखण्याचा प्रयत्न केला. कोहलीने चेंडू मिड-ऑन आणि मिड-विकेटमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, पण शॉर्ट मिड-विकेटच्या दिशेने उभ्या असलेल्या केन विल्यमसनने (Kane Williamson) सोपा झेल घेत कोहलीला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे विराट कोहली या मोसमात तिसऱ्यांदा आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सलग दुसऱ्यांदा गोल्डन डकवर बाद झाला. (IPL 2022, SRH vs RCB: फाफ डु प्लेसिसचे जोरदार अर्धशतक, Dinesh Karthik ची फटकेबाजी; सनरायझर्स हैदराबादला हव्या 193 धावा)

विराट कोहली बाद होताच जगदीश सुचितने एका स्पेशल यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. सामन्याच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा सुचित हा आयपीएलच्या इतिहासातील तिसरा फिरकी गोलंदाज ठरला आहे. केविन पीटरसनने 2009 मध्ये आणि मार्लन सॅम्युअल्सने 2012 मध्ये ही कामगिरी केली होती. आणि आता 12 वर्षांनंतर जगदीश सुचित यांनी हा करिष्मा पुन्हा केला आहे. आयपीएल2020 मध्ये पदार्पण करणाऱ्या सुचितने आतापर्यंत एकूण 20 सामने खेळले आहेत ज्यात त्याने 16 विकेटसह 68 धावा केल्या आहेत. 2020 मध्ये तो पंजाब किंग्जचा भाग होता, तर गेल्या दोन वर्षांपासून तो सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळत आहे.

दरम्यान सामन्याबद्दल बोलायचे तर आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. आरसीबीने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही, परंतु हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने दोन बदल जाहीर केले. SRH ने सीन एबोटच्या जागी जगदीश सुचित आणि श्रेयस गोपालच्या जागी अफगाणिस्तानच्या फजलहक फारुकी यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. सामन्यात आरसीबी कर्णधार डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 192 धावांपर्यंत मजल मारली आणि हैदराबादसमोर 193 धावांचे लक्ष्य ठेवले. फाफ डु प्लेसिस 73 आणि दिनेश कार्तिक 8 चेंडूत 30 धावा करून नाबाद परतले.