IPL 2022, SRH vs RCB: फाफ डु प्लेसिसचे जोरदार अर्धशतक, Dinesh Karthik ची फटकेबाजी; सनरायझर्स हैदराबादला हव्या 193 धावा

IPL 2022, RCB vs SRH: आयपीएल 2022 च्या 54 व्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने निर्धारित 20 षटकांत तीन बाद 192 धावा केल्या आणि सनरायझर्स हैदराबादपुढे विजयासाठी 193 धावांचे भव्य टार्गेट ठेवले आहे. आरसीबीसाठी कर्णधार फाफ डु प्लेसिसने पुढाकार घेत 73 धावांची निर्णायक खेळी केली. तर दिनेश कार्तिक 8 चेंडूत 30 धावा करून नाबाद परतला.

IPL 2022, SRH vs RCB: फाफ डु प्लेसिसचे जोरदार अर्धशतक, Dinesh Karthik ची फटकेबाजी; सनरायझर्स हैदराबादला हव्या 193 धावा
फाफ डु प्लेसिस (Photo Credit: PTI)

IPL 2022, RCB vs SRH: आयपीएल (IPL) 2022 च्या 54 व्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) निर्धारित 20 षटकांत तीन बाद 192 धावा केल्या आणि सनरायझर्स हैदराबादपुढे (Sunrisers Hyderabad) विजयासाठी 193 धावांचे भव्य टार्गेट ठेवले आहे. आरसीबीसाठी कर्णधार फाफ डु प्लेसिसने (Faf du Plessis) पुढाकार घेत 73 धावांची निर्णायक खेळी केली. तर रजत पाटीदारने 48 आणि ग्लेन मॅक्सवेलने 33 धावांचे योगदान दिले. तसेच दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) 8 चेंडूत 30 धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे SRH साठी जगदीशा सुचितने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर कार्तिक त्यागीने एक गडी बाद केला. या सामन्यात हैदराबादच्या क्षेत्ररक्षणाने निराश केले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 08, 2022 05:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).