IPL 2022: दक्षिण आफ्रिकेने (South Africa) बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांच्या मायदेशातील मालिकेसाठी त्यांच्या 15 सदस्यीय कसोटी संघातून कगिसो रबाडा (Kagiso Rabada), लुंगी एनगिडी आणि मार्को जॅन्सेन (Marco Jansen) तसेच फलंदाज एडन मार्करम आणि रॅसी व्हॅन डर डुसेन यासारख्या आयपीएलमध्ये (IPL) खेळणाऱ्या धाकड खेळाडूंना अपेक्षितपणे वगळले आहे. भारताविरुद्ध घरच्या मालिकेत प्रभावित झालेल्या जॅन्सेनला आयपीएल लिलावात सनरायझर्स हैदराबादने खरेदी केले तर पंजाब किंग्सने रबाडावर मोठा डाव लावला. तसेच एनगिडी दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) प्रतिनिधित्व करेल तर फिटनेस समस्यांमुळे एनरिच नॉर्टजेच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह कायम आहेत. तो दिल्ली कॅपिटल्ससाठी राखून ठेवलेल्या खेळाडूंपैकी एक होता. (IPL 2022: अरेरे! डझनभर परदेशी स्टार खेळाडू आयपीएल 2022 च्या पहिल्या आठवड्याला मुकणार, पहा फ्रेंचायझीनुसार खेळाडूंची यादी)
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने आयपीएलमध्ये खेळायचे की मालिकेत खेळायचे याचा निर्णय खेळाडूंवर सोडणार असल्याचे सांगितले होते, ज्याला कसोटी कर्णधार डीन एल्गरने ‘निष्ठांची लिटमस टेस्ट’ म्हटले. मधल्या फळीतील फलंदाज खाया झोंडोला प्रथमच कसोटी संघात संधी मिळाली आणि अनकॅप्ड वेगवान डॅरिन डुपाव्हिलॉन यालाही संघात स्थान मिळाले आहे. दरम्यान, नॉर्टजे याला पुन्हा एकदा प्रदीर्घ पाठ आणि हिपच्या समस्येमुळे बाहेर करण्यात आले. म्हणजेच दिल्ली कॅपिटल्ससाठी नॉर्टजेच्या उपलब्धतेबद्दल कोणतीही स्पष्टता नसल्याचे यामुळे स्पष्ट होते. नोर्टजे यूएईमध्ये शेवटी नोव्हेंबर मध्ये टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेत खेळला होता.
Dean Elgar's #Proteas squad to take on Bangladesh in the 2️⃣ match #BetwayTestSeries.
Khaya Zondo receives his first Test call-up.
📅 31 Mar - 12 Apr
🏟️ Hollywoodbets Kingsmead Stadium, Durban | St George's Park, Gqeberha#SAvBAN #BePartOfIt pic.twitter.com/F1GIk6a4Du
— Cricket South Africa (@OfficialCSA) March 17, 2022
दरम्यान, बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेनंतर खेळाडू 26 मार्चपासून होणाऱ्या आयपीएलसाठी भारत दौऱ्यावर रवाना होतील. दक्षिण आफ्रिकन क्रिकेटर्स असोसिएशन (SACA) सोबत CSA च्या सध्याच्या सामंजस्य करारानुसार बोर्ड खेळाडूंना IPL मध्ये भाग घेण्याची संधी नाकारू शकत नाही, कारण दोन्ही संस्था खेळाडूंचे जीवनमान आणि संधी व राष्ट्रीय संघातील त्यांची कर्तव्ये यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतात. दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश पहिली कसोटी 31 मार्चपासून डर्बन आणि दुसरी कसोटी 7 एप्रिलपासून पोर्ट एलिझाबेथ येथे खेळली जाणार आहे.