IPL 2022 Foreign Players: अगदी नवीन स्वरूप आणि दोन नवीन संघांसह, इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premire League) 15वी आवृत्ती पूर्वीपेक्षा मोठी आणि चांगली बनलेली दिसत आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स आयपीएलमध्ये (IPL) या वर्षांपासून पदार्पण करत आहेत. आयपीएलच्या मेगा लिलावानंतर सर्व खेळाडूंचे स्वरूप बदलले आहेत. यापूर्वी आपल्या संघाची ताकद असलेले खेळाडू आता दुसऱ्या संघाकडून खेळण्यासाठी सज्ज आहेत. मात्र, सुरुवातीचे काही दिवस देशांतर्गत खेळाडूंचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. यामागचे कारण म्हणजे अनेक खेळाडू आंतराष्ट्रीय सामने खेळत आहेत तर काही खेळाडूंना दुखापतीमुळे पहिल्या आठवड्यातून बाहेर बसणे भाग पडणार आहे. अशा परिस्थितीत आतापर्यंत ज्या खेळाडूंची नावे समोर आली आहे त्यानुसार सर्व दहा फ्रँचायझींमधील तब्ब्ल 25 परदेशी स्टार खेळाडूंना सुरुवातीच्या काही सामन्यातून बाहेर बसावे लागणार आहे. (IPL 2022: फ्रँचायझींना झटक्यावर झटके; IPL पूर्वीच दोन इंग्लंड खेळाडूंनी माघार घेतली, आता ‘हा’ धाकड गोलंदाजही बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर)
तीन द्विपक्षीय मालिकांचे वेळापत्रक आयपीएल 2022 च्या तारखांशी जुळत असल्यामुळे टी-20 सुपरस्टार्स त्यांच्या संबंधित आयपीएल संघांच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये दिसणार नाही. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेचा अंतिम सामना 28 मार्च रोजी खेळला जाणार आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सध्या कसोटी मालिका खेळली जात असून त्यानंतर तीन वनडे आणि एक टी-20 सामना होणार आहे. कसोटी मालिका 25 मार्च तर एकूण दौरा 5 एप्रिल रोजी संपेल. याशिवाय दक्षिण आफ्रिका बांगलादेशविरुद्ध तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेचा अंतिम सामना 23 मार्च, तर कसोटी मालिका 12 एप्रिल रोजी संपुष्टात येईल. अशा परिस्थितीत या देशातील स्टार खेळाडू आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यातून बाहेर बसतील. दुसरीकडे, उल्लेखनीय आहे की यामुळे यावर्षी 10 पैकी 9 फ्रँचायझी संघांना याचा फटका बसणार आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हा एकमेव संघ आहे जो आंतरराष्ट्रीय वेळापत्रकांमुळे कोणताही खेळाडू गमावणार नाही.
IPL 2022 ची सुरुवात चुकवणाऱ्या खेळाडूंची फ्रँचायझीनुसार यादी पहा...
1. चेन्नई सुपर किंग्स – ड्वेन प्रिटोरियस
2. कोलकाता नाईट रायडर्स – पॅट कमिन्स आणि आरोन फिंच
3. राजस्थान रॉयल्स – रॅसी व्हॅन डर डुसेन
4. सनरायझर्स हैदराबाद – मार्को जॅन्सन, शॉन एबॉट, एडन मार्करम
5. दिल्ली कॅपिटल्स – डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, एनरिच नॉर्टजे (दुखापत), मुस्तफिजूर रहमान, लुंगी एनगिडी
6. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – जेसन बेहरेनडोर्फ, ग्लेन मॅक्सवेल, जोश हेझलवूड
7. पंजाब किंग्स - जॉनी बेअरस्टो, कागिसो रबाडा, नॅथन एलिस
8. लखनऊ सुपर जायंट्स - मार्कस स्टोइनिस, जेसन होल्डर, काइल मेयर्स, मार्क वुड, क्विंटन डी कॉक
9. गुजरात टायटन्स – डेविड मिलर, अल्झारी जोसेफ