रविचंद्रन अश्विन (Photo Credit: PTI)

IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: आयपीएल (IPL) 2022 च्या क्वालिफायर 2 मध्ये शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशी होणार आहे. राजस्थानला त्यांच्या शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला तर बुधवारी एलिमिनेटरमध्ये आरसीबीने (RCB) लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. अहमदाबाद येथील क्वालिफायर 2 मध्ये खेळपट्टी कशी असेल याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दोन्ही संघ त्यांच्या फिरकीपटूंवर अवलंबून आहेत आणि खेळपट्टीने फिरकीपटूंना मदत केली तर ते खेळाचा नायक ठरतील. युजवेंद्र चहलसोबत अश्विन (Ashwin) आहे जो ऑफस्पिन गोलंदाजी करतो परंतु भारताच्या माजी क्रिकेटपटूला वाटते की ऑफस्पिनर सपाट ट्रॅकवर राजस्थानसाठी मोठे डोकेदुखी असेल. (IPL 2022, RR vs RC: राजस्थान-बेंगलोर Qualifier 2 सामन्याबाबत रवी शास्त्रींचे भाकीत, जाणून घ्या कोणावर लावला दाव)

“सपाट ट्रॅकवर रविचंद्रन अश्विन ही RR साठी समस्या आहे कारण तो खूप भिन्नतेचा प्रयत्न करतो. अशा प्रसंगी तो कमी ऑफ-स्पिनर गोलंदाजी करतो. पण जेव्हा वळण येते तेव्हा तो धोकादायक गोलंदाज बनतो. फिरकीपटूंसाठी खेळपट्टी अनुकूल असेल तर राजस्थानला फायदा होईल कारण चहल आणि अश्विन एकत्र गोलंदाजी करतील,” मांजरेकरने ESPNcricinfo ला सांगितले. आयपीएल 2022 च्या आतापर्यंत 15 सामन्यांमध्ये अश्विनने 11 विकेट्स घेतल्या आहेत. त्यापैकी बहुतेक निर्णायक ठरल्या आहेत. विरोधी संघातून सर्वोत्तम फलंदाजाची विकेट घेण्यावर तो विश्वास देतो. याशिवाय अश्विनने 185 धावाही केल्या आहेत. तसेच 2009 मध्ये पदार्पण केल्यानंतर फलंदाजीचा विचार करता अश्विनचा हा सर्वोत्तम हंगाम ठरला आहे.

दरम्यान, बेंगलोर आणि राजस्थान, या दोन्ही संघांनी स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे, जिथे ते विजेतेपदाचा दुष्काळ संपवू शकतात. बेंगलोरने अद्याप एकही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाही. त्याचवेळी 2008 मध्ये आयपीएलचा पहिला सीझन जिंकल्यापासून राजस्थान दुसऱ्या जेतेपदाच्या शोधात आहेत. मांजरेकर पुढे म्हणाले की,  “डेथ बॉलिंग ही राजस्थान रॉयल्ससाठी कमकुवतपणा आहे. ट्रेंट बोल्ट हा जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे, परंतु त्यांना नवीन चेंडूचा वापर करावा लागेल कारण डेथ ओव्हर्समध्ये त्याचा विक्रम फारसा चांगला नाही. त्यांनी प्रसिध कृष्णाला पाठिंबा दिला आहे आणि त्याने या मोसमात चांगली कामगिरी केली आहे. ओबेद मॅककॉय हे एक सरप्राईज पॅकेज ठरला आहे आणि ते त्याच्यावर विश्वास ठेवतील.”