RR vs RCB Qualifier 2 IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 15 चा दुसरा क्वालिफायर सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. यापूर्वी भारताचे माजी दिग्गज फलंदाज आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी या सामन्यावर प्रतिक्रिया दिली आहे. रविवारी गुजरात टायटन्सविरुद्ध होणाऱ्या विजेतेपदाच्या लढतीत दोन्ही संघांना विजय मिळवायचा असल्याने या सामन्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आरसीबीला (RCB) अनेक वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावण्यात अपयश आले आहे. (IPL 2022: लखनौविरुद्ध मॅच विनिंग शतकानंतर रजत पाटीदारचे ट्विट, विराट कोहलीचे मानले आभार See Tweet)

शास्त्री एका स्टार स्पोर्ट्स क्रिकेट लाइव्ह शोमध्ये म्हणाले, “आरसीबीला 14 वर्षे झाली आहेत (त्यांच्याकडे विजेतेपद नाही) आणि राजस्थानने उद्घाटन हंगामात त्यांचे शेवटचे विजेतेपद जिंकल्यापासून 13 वर्षे झाली आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये 27 वर्षे झाली. दोघांनाही विजय गरजेचा आहे आणि ही रॉयल्सची लढाई असेल. चला त्याची वाट पाहूया.” आयपीएल 2022 मध्ये, बेंगलोर आणि राजस्थान या दोन्ही संघांनी स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे, जिथे ते विजेतेपदाचा दुष्काळ संपवू इच्छित आहेत. बेंगलोरला अद्याप पहिला आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही. 2008 मध्ये आयपीएलचा पहिला सीझन जिंकल्यापासून राजस्थान विजयची पुनरावृत्ती करण्यात अपयशी ठरला आहे. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना आणि रजत पाटीदारच्या 112 नाबाद शतकाच्या जोरावर बेंगलोरने 20 षटकांत 4 बाद 207 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात आयपीएल पदार्पण करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकांत 6 बाद 193 धावाच केल्या, त्यामुळे त्यांना फिनिशिंग लाइन पार करण्यात अपयश आहे आणि स्पर्धेतून बाद होणे भाग पडले.

कोलकातामध्ये हायव्होल्टेज आणि मोठ्या धावसंख्येच्या मालिकेनंतर अहमदाबाद येथे सामना होईल. क्वालिफायर 2 नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियम (जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम) येथे खेळला जाईल. तसेच फायनल 29 मे रोजी त्याच मैदानावर खेळवली जाणार आहे. दरम्यान लखनौ सुपर जायंट्ससोबत आरसीबीच्या एलिमिनेटर 1 च्या लढतीबद्दल बोलायचे तर फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने बुधवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर नवीन फ्रँचायझी लखनौचा 14 धावांनी पराभव करत क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)