IPL 2022: दिल्लीच्या खराब कामगिरीवर Ricky Ponting संतापले! मॅच दरम्यात रागाच्या भरात तोडले 3-4 टीव्ही रिमोट, क्वारंटाईनमधून बाहेर येऊन खुलासा
रिकी पाँटिंग (Photo Credit: Instagram/delhicapitals)

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाची कामगिरी काही विशेष ठरली नाही. सात सामन्यांत चार पराभव आणि तीन विजयांसह दिल्ली गुणतालिकेत सातव्या क्रमणकवर आहेत. मात्र, संघाचे प्रशिक्षक रिकी पाँटिंगचे (Ricky Ponting) मत आहे की त्यांच्या संघाला विजयी मार्गावर परतण्यासाठी फक्त गतीची गरज आहे. क्वारंटाईनमधून बाहेर आल्यानंतर पाँटिंगने अनेक विषयांवर चर्चा केली. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धचा सामना हॉटेलच्या खोलीतून पाहताना तीन ते चार टीव्हीचे रिमोट तोडल्याचे त्यांनी म्हटले. याशिवाय अनेक पाण्याच्या बाटल्याही भिंतीवर फेकल्या. दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक पॉन्टिंग म्हणाले की, संघ आयपीएलच्या (IPL) 2022 दुसऱ्या सहामाहीत जाताना 5 दिवसांचा अलगाव पूर्ण केल्यानंतर पुन्हा परत येण्यासाठी ते उत्साही आहेत. पाँटिंगच्या कुटुंबातील एका सदस्याची कोविड -19 साठी सकारात्मक आल्यामुळे त्यांना शुक्रवारी, 22 एप्रिल रोजी राजस्थानविरुद्धचा सामन्यातून बाहेर बसावे लागले होते. (IPL 2022, No-Ball Controversy: नो-बॉल वादावर शेन वॉटसन यांनी आपल्याच संघाला फटकारले, Rishabh Pant-प्रवीण अमरेची घेतली शाळा; पाहा काय म्हणाले)

रिकी पाँटिंगचा कोविड-19अहवाल नकारात्मक आल्याची दिल्ली कॅपिटल्सने पुष्टी केली परंतु खबरदारीचा उपाय म्हणून त्याला वेगळे करण्यात आले. सामन्यातून बाहेर राहिल्या वेळेची आठवण करून देताना पॉन्टिंग म्हणाला की राजस्थान रॉयल्सकडून शेवटच्या षटकातील थरारक सामना हरले तेव्हा बाजूला राहून संघाला सूचना देऊ न शकणे हा निराशाजनक अनुभव असल्याचे पाँटिंग म्हणाला. ऑस्ट्रेलियन खेळाडूने सांगितले की त्याने हॉटेलच्या खोलीतील काही टेलिव्हिजनचे रिमोट तोडले आणि आपली निराशा बाहेर काढली. “पुन्हा बाहेर परत आल्याने आनंद झाला. निराशाजनक (संघासह प्रवास न करणे). मी 3-4 रिमोट कंट्रोल तोडले. 3 किंवा 4 पाण्याच्या बाटल्या भिंतीवर फेकल्या असतील,” पाँटिंगने दिल्ली कॅपिटल्सला सांगितले. “जेव्हा तुम्ही प्रशिक्षक म्हणून बाजूला राहता आणि मध्यभागी काय घडत आहे त्यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही तेव्हा ते कठीण असते. जेव्हा तुम्ही बाजूला नसता, आणि प्रत्येक षटकावर मजकूर संदेश पाठवत आहात, ‘हे करा, ते करा, करा हे’. हे जरा जास्तच निराशाजनक झाले,” ते पुढे म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Delhi Capitals (@delhicapitals)

लक्षणीय आहे की दिल्ली कॅपिटल्सने पाच वेळा आयपीएलचे माजी विजेते मुंबई इंडियन्सला पराभूत करून त्यांच्या मोहिमेची चांगली सुरुवात केली, परंतु गेल्या 2 हंगामात त्यांना प्लेऑफ पर्यंत पोहोचवलेल्या सातत्याचा त्यांच्यात दबाव दिसला. तसेच यंदाच्या सीझनमध्ये दिल्लीला सलग दोन विजय मिळवता आलेले नाहीत. यावर पाँटिंगने असेही सांगितले की त्यांचा संघ एका सामन्यात 36 ते 37 षटकांपर्यंत चांगला खेळतो, परंतु संपूर्ण सामना तीन ते चार षटकांत हरतो. याच कारणामुळे संघाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. तर पॉन्टिंगने उत्तरार्धात आपल्या खेळाडूंना विजयासाठी जास्त टेन्शन घेऊ नका, असा इशारा दिला.