IPL 2022 Playoffs: आयपीएलचा आज निर्णायक वीकेंड; दोन सामन्यांचे निकाल ठरवणार 6 संघांच्या प्लेऑफचे भवितव्य, पाहा ते कसे?
आयपीएल 2022 ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022 Playoffs: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 चा आज महत्त्वाचा वीकेंड आहे. 4 पैकी 2 बंपर सामने आधीच संपले आहेत आणि आजच्या दोन सामन्यांचे निकाल सात आयपीएल (IPL) संघांचे भवितव्य ठरवू शकते. पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स, कोलकाता नाइट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्सचे नशीब या आठवड्यात ठरेल. शनिवारी अनुक्रमे राजस्थान रॉयल्स आणि लखनौकडून पराभूत झाल्यानंतर पंजाब, कोलकाता पॉईंट टेबलच्या मध्यभागी आहेत आणि प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होताना दिसत आहेत. रविवार, 8 मे रोजी हैदराबाद विरुद्ध आरसीबी आणि चेन्नई विरुद्ध दिल्लीच्या डबल हेडर सामन्याने प्लेऑफचे चित्र स्पष्ट होईल. (IPL 2022 Points Table Updated: कोलकाताचा धुव्वा उडवत लखनौ नवीन ‘टेबल टॉपर’, PBKS चा पराभव करूनही राजस्थानचे तिसरे स्थान अबाधित)

आरसीबी विजयासह प्लेऑफच्या संधी मजबूत करू शकतो. तर हैदराबादला Playoff शर्यतीत आपले आव्हान काय ठेवण्यासाठी विजय आवश्यक आहे. याशिवाय CSK आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे परंतु ते विजयासह दिल्लीचा खेळ खराब करू शकतात. तसेच टॉप 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाला सामना जिंकणे आवश्यक आहे. गुजरात टायटन्सचा शुक्रवारी या मोसमातील तिसरा पराभव झाला. मुंबई इंडियन्सविरुद्ध गुजरातला 9 धावांनी पराभव पत्करावा लागला. तथापि, ते अजूनही 11 सामन्यांत 16 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानाचे मजबूत दावेदार आहेत. लखनौ सुपर जायंट्सने केकेआरवर 75 धावांनी विजय मिळवत अव्वल स्थानावर झेप घेतली. 11 सामन्यांतून 16 गुणांसह LSG गुजरातवर नेट रन रेटने वरचढ ठरला. अशा परिस्थितीत आता लखनौ आणि गुजरातला प्लेऑफचे तिकीट मिळवण्यासाठी आणखी सामना जिंकायचा आहे. संजू सॅमसनची राजस्थान रॉयल्स प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी सर्वात आवडत्या संघांपैकी एक आहे. राजस्थानला या स्पर्धेत तीन शिल्लक सामन्यातून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी आणखी दोन विजयांची गरज आहे.

दुसरीकडे, डु प्लेसिसच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील. आरसीबी 16 गुणांसह पात्र ठरू शकतील परंतु इतर निकाल देखील त्यांच्या बाजूने लागणे गरजेचे आहे. तसेच सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात पराभवाची हॅटट्रिक करून प्रकरणे गुंतागुंतीची केली आहेत. SRH आता 6 व्या स्थानावर आहे आणि त्यांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी शक्य होईल तितके सामने जिंकणे गरजेचे आहे. मयंक अग्रवालच्या पंजाब किंग्स आणि श्रेयस अय्यरच्या आपल्या अंतिम 4 च्या आशा पल्लवित ठेवण्यासाठी उर्वरित तीनही सामने जिंकायचे असून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला 4 पैकी तीन सामने जिंकावे लागतील. 10 सामन्यांमध्ये फक्त तीन विजयांसह, CSK गुणतालिकेत 9व्या क्रमांकावर आहे आणि जरी त्यांनी सर्व चारही सामने जिंकले तरी धोनी ब्रिगेड जास्तीत जास्त 14 गुणांपर्यंत पोहोचू शकते जे पुरेसे होणार नाही. अखेरीस मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे.