IPL 2022 Points Table Updated: हैदराबादवर 5 विकेट्सने विजय मिळवत पंजाबच्या मोहिमेचा शेवट गोड, आता 4 संघात प्ले ऑफमध्ये होणार ‘काटे की टक्कर’
आयपीएल 2022 ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022 Points Table Updated: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) ची 15 वी आवृत्ती चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्या सलामीच्या सामन्याने सुरु झाली आहे. विद्यमान 8 आयपीएल (IPL) संघांना विस्तारित करून आणखी दोन म्हणजेच एकूण 10 संघांमध्ये यावर्षी ही स्पर्धा खेळली जाणार आहे. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन नवीन संघ यावर्षीपासून आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे. आयपीएल 2022 मध्ये 70 लीग सामने आणि 4 नॉकआउट सामने खेळले जातील. कोविड-19 प्रोटोकॉलचे अनुसरण करण्याच्या उद्देशांत बीसीसीआयने या वर्षी संपूर्ण स्पर्धा मुंबई आणि पुणे येथे - वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियम व पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम या चार ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय घेतला. (IPL 2022 Purple Cap Updated List: पहिल्या आयपीएल सामन्यानंतर कोणाच्या डोक्यावर पर्पल कॅप, पहा टॉप-5 लिस्ट)

आयपीएल 2022 पॉईंट टेबल

Position Teams Matches Won Lost Tied NR Points NRR
Q गुजरात टायटन्स 14 10 4 0 0 20 +0.316
Q राजस्थान रॉयल्स 14 9 5 0 0 18 +0.298
Q लखनऊ सुपर जायंट्स 14 9 5 0 0 18 +0.251
Q रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर 14 8 6 0 0 16 -0.253
5 दिल्ली कॅपिटल्स 14 7 7 0 0 14 +0.204
6 पंजाब किंग्स 14 7 8 0 0 14 +0.126
7 कोलकाता नाईट रायडर्स 14 6 8 0 0 12 +0.146
8 सनरायझर्स हैदराबाद 14 6 8 0 0 12 -0.379
9 चेन्नई सुपर किंग्स 14 4 10 0 0 8 -0.203
10 मुंबई इंडियन्स 14 4 10 0 0 8 --0.506

दोन नवीन संघांच्या समावेशासह इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चे स्वरूप देखील बदलले गेले आहे. संघाना प्रत्येकी 5 च्या गटात विभागले गेले आहेत. सर्व 10 संघ प्रत्येकी 14 सामने खेळतील. आणि जुन्या फॉरमॅटनुसार प्रत्येक संघ एका संघांविरुद्ध चार आणि पाच संघांविरुद्ध दोनदा खेळेल. यानंतर 2022 लीग टप्प्यातील सर्व सामने संपले की अव्वल चार संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करतील. IPL 2022 चा अंतिम सामना 29 मे रोजी खेळला जाईल, तर ही ‘महा’ स्पर्धा एकूण 65 दिवस चालणार आहे. इंडियन प्रीमियर लीग 2022 चे सामने महाराष्ट्रातील 4 ठिकाणी 25 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळवले जातील. याशिवाय दोन गटात विभागले गेले असले तरी सर्व संघ एकाच गुणपत्रिकेवर क्रमवारीत असतील. आयपीएल पॉइंट टेबलमधील संघांची स्थिती प्रत्येक संघाच्या गुणांवर आधारित आहे. याशिवाय ‘नेट रन रेट’ (NRR) जेव्हा लीग स्टेजच्या शेवटी संघांचे गुण समान असतात तेव्हा ग्राह्य धरले जाते.