IPL 2022 Qualifier 1: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) पहिल्या क्वालिफायर सामन्यावर हवामानाचे संकट आहे. कोलकाता (Kolkata) येथे होणार्या आयपीएल (IPL) 2022 क्वालिफायर 1 पूर्वी वादळ-पावसामुळे ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) प्रचंड विध्वंस झाला आहे. शनिवारीही जोरदार वादळामुळे ईडन गार्डनच्या प्रेस बॉक्सचे मोठे नुकसान झाल्याचे समजले आहे. मंगळवारी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) क्वालिफायर 1 सामन्याच्या दिवशी जोरदार वादळ आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हा सामना धुवून गेल्यास सामन्याचे काय होणार असा प्रश्न निर्माण होत आहे. गुजरात पॉइंट टेबलमध्ये पहिले तर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, खराब हवामानामुळे हा सामना विस्कळीत होऊ शकतो. (IPL 2022 PlayOffs: कोलकात्याच्या मार्गावर राजस्थान रॉयल्सच्या विमानात टर्बुलन्स, फ्रँचायझीने शेअर केला प्रवासाचा थरारक व्हिडिओ Watch)
मंगळवारी देखील कोलकात्यात पावसाळी हवामान राहणे अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत हा सामना पावसामुळे वाहून गेला तर कोणता संघ फायनल खेळणार? आणि याचा उर्वरित सामन्यांवर काय परिणाम होईल? हे जाणून घेऊया. शनिवारी कोलकाता येथे मुसळधार पाऊस आणि वादळामुळे ईडन गार्डनमध्ये नुकसान झाले आहे. स्टेडियमच्या प्रेस बॉक्सच्या समोरील भागाची काच फुटली आहे. त्याचबरोबर होर्डिंग्जही पडले आहेत. त्याचवेळी खेळपट्टीला पावसापासून वाचवण्यासाठी लावलेल्या कव्हर्सचा मोठा भाग उडून गेला आहे. तथापि पावसामुळे सामना वाहून गेल्यास गुजरात टायटन्स संघाला याचा मोठा फायदा होईल. गुजरातचा संघ गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर असून सामना रद्द झाल्यास ते थेट अंतिम सामन्यात पोहोचतील. तर राजस्थान रॉयल्स संघ एलिमिनेटर सामन्यात प्रवेश करेल. जिथे तिचा सामना एलिमिनेटरच्या विजेत्या संघाशी होईल.
IPL च्या व्यस्त वेळापत्रकामुळे गुजरात आणि राजस्थान यांच्यातील क्वालिफायर 1 साठी कोणताही राखीव दिवस नाही. अशा परिस्थितीत गुजरात लीग टप्पा संपल्यानंतर गुणतालिकेत अव्वल स्थानावर असल्याने थेट अंतिम फेरीत पोहोचेल. जिथे तिचा सामना एलिमिनेटरच्या विजेत्या संघाशी होईल. मंगळवारी पहिल्या क्वालिफायर सामन्यानंतर बुधवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात एलिमिनेटर खेळला जाईल. एलिमिनेटरही कोलकात्यात खेळवला जाणार आहे. त्यामुळे पावसाने हा सामनाही खराब केल्यास लखनऊ क्वालिफायर-2 मध्ये पोहोचेल.