IPL 2022, MI vs CSK Match 33: किरॉन पोलार्डचे मुंबई इंडियन्स संघात काय काम? सलग 6 पराभवानंतर दिग्गज खेळाडूवर संजय मांजरेकरांनी उचलले बोट
संजय मांजरेकर, किरॉन पोलार्ड (Photo Credit: Instagram)

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने (Kieron Pollard) बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धक्कादायक निवृत्ती जाहीर केली. पोलार्ड फक्त 34 वर्षांचा आहे. पण आयपीएल (IPL) 2022 मध्ये सतत फ्लॉप झाल्यानंतर पोलार्डने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतल्याचे अनुमान लावला जात आहे. पोलार्डच्या या निर्णयामुळे बहुतेक तज्ज्ञ आश्चर्यचकित झाले आहेत, पण भारताचे माजी फलंदाज आणि क्रिकेट समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी आश्‍चर्य व्यक्त केलं नसून, पोलार्डच्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) प्लेइंग इलेव्हनमध्ये राहण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यावेळी पोलार्ड जुन्या लयीत खेळत नसल्याने मुंबईला येथे सलग 6 पराभवांना सामोरे जावे लागल्याचे मांजरेकर यांनी म्हणाले. मांजरेकर म्हणाले की, मुंबईचा हा अष्टपैलू यावेळी त्याच्या संघाच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. (IPL 2022, MI vs CSK: मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगणार आयपीएलचा El Classico, ‘या’ धुरंधर खेळाडूंमध्ये होणार काट्याची टक्कर)

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध ‘करो या मरो’च्या सामन्यापूर्वी, मांजरेकर यांनी मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पोलार्डच्या स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मांजरेकरांच्या मते आयपीएल 2022 मध्ये MI ने 6 सामने गमावण्याचे मुख्य कारण म्हणजे पोलार्ड आहे. पोलार्डने या मोसमात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 6 सामन्यांमध्ये 16 च्या सरासरीने केवळ 82 धावा करत फलंदाजी करण्यात अपयशी ठरला आहे. परिणामी, फ्रँचायझी मधल्या फळीत सूर्यकुमार यादववर पूर्णपणे अवलंबून आहे. तर गोलंदाजीतही त्याला केवळ एकच विकेट मिळाली आहे. अशा स्थितीत मुंबई संघाला येथे निव्वळ अष्टपैलू खेळाडूची उणीव भासत असल्याचे मांजरेकर यांचे मत आहे. याशिवाय प्लेइंग इलेव्हनमध्ये पोलार्डला पाठिंब्या देण्याचे म्हणजे सिक्सर स्पेशालिस्ट मेगा लिलावात MI ने महागात खरेदी केलेल्या टिम डेविडला बेंचवर बसवणे आहे.

“मला माहित नाही की मुंबई इंडियन्सने पोलार्ड अपायकारक असल्याचा विचार केला आहे की नाही. पण माझा विश्वास आहे की पोलार्डला चार नाही तर किमान तीन षटके टाकावी लागतील कारण संघाला गोलंदाजाची नितांत गरज आहे. माझ्या मते दबावाखाली तो या संघातील अनेक गोलंदाजांपेक्षा सरस आहे. त्यामुळे, जर तो गोलंदाजी करत नसेल आणि शेवटी फलंदाजी करत असेल, तर मला वाटते की त्यांनी पोलार्डच्या धावसंख्येकडे आणि योगदानाकडे लक्ष दिले पाहिजे,” मांजरेकर यांनी ESPNCricinfo ला सांगितले.