IPL 2022, MI vs CSK: मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगणार आयपीएलचा El Classico, ‘या’ धुरंधर खेळाडूंमध्ये होणार काट्याची टक्कर
एमएस धोनी आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs CSK: आयपीएलच्या (IPL) इतिहासात सर्वाधिक विजेतेपदं जिंकणारे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात गुरुवार, 21 एप्रिल रोजी नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मधील सर्वात यशस्वी पण सध्या पॉईंट टेबलमध्ये तळाशी बसलेले मुंबई आणि चेन्नई यांच्यात चाहत्यांना मनोरंजक स्पर्धेचा अनुभव घ्यायला मिळणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) अँड कंपनीचा आणखी एक पराभव त्यांना लागोपाठ हंगामातील आयपीएल प्लेऑफच्या स्पर्धेपासून बाहेर करेल. दरम्यान, रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) नेतृत्वातील CSK साठी आणखी एक अपयश देखील त्यांचा हंगाम गणितीय दृष्ट्या बिघडवेल. पाच वेळचा चॅम्पियन मुंबई संघ या मोसमात एकही सामना जिंकू शकलेला नाही. गतविजेत्या चेन्नईची स्थितीही चांगली नाही आणि ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी पण मुंबईपेक्षा फक्त एक स्थान वर आहेत. या सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या लढतीवर चाहत्यांची करडी नजर असेल. (IPL 2022: कमेंटरी रूममधून धवल कुलकर्णीची मुंबई इंडियन्स ताफ्यात होणार होमकमिंग? सलग 6 सामने हरल्यानंतर रोहित शर्माला झाली आठवण)

1. एमएस धोनी विरुद्ध मुरुगन अश्विन

सीएसकेचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि ऑफ स्पिनर मुरुगन अश्विन (Murugan Ashwin) यांच्यात आमनासामना होण्याची शक्यता आहे. राशिद खान, सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांसारखे लेग स्पिनर धोनीविरुद्ध घातक ठरले आहेत. एमएस धोनी क्रीजवर आल्यानंतर अश्विन झटपट गोलंदाजी करायला आला तर आश्चर्य वाटायला नको.

2. रोहित शर्मा विरुद्ध रवींद्र जडेजा

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित केवळ कर्णधार म्हणून नाही तर फलंदाज म्हणूनही जडेजाविरुद्ध मैदानात उतरेल. CSK अष्टपैलूने रोहितला टी-20 मध्ये 83 धावा देऊन तीनदा बाद केले आहे. रोहित शर्माने एकदा लय पकडली तर जडेजा पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करू शकतो.

3. ईशान किशन विरुद्ध फिरकीपटू

मुंबईचा सलामीवीर ईशान किशनला (Ishan Kishan) पॉवरप्ले ओव्हर्समध्ये सेट झाल्यावर फिरकीपटूंची धुलाई करण्यास आवडते. महेश तीक्षणा, मोईन अली आणि डावखुरा फिरकीपटू जडेजा यांच्यावर किशनला महत्त्वपूर्ण सामन्यात रोखण्याची जबाबदारी असेल.

4. किरॉन पोलार्ड विरुद्ध ड्वेन ब्रावो

वेस्ट इंडिजचे दोन दिग्गज पोलार्ड आणि ब्रावो यांच्यातील लढत मनोरंजक होण्याची शक्यता आहे. पोलार्ड ‘द फिनिशर’ आयपीएलचा सर्वोत्तम डेथ बॉलर ‘ब्रावो’ विरुद्ध समोर येऊ शकतो? ख्रिस जॉर्डन आणि अननुभवी मुकेश चौधरी यांच्या घसरणीसह CSK ब्रावोच्या डेथ बॉलिंगवर अवलंबून असल्याने ही स्पर्धा सामन्याचे भवितव्य देखील ठरवू शकते.

5. रॉबिन उथप्पा विरुद्ध जयदेव उनाडकट

पॉवरप्लेमध्ये सीएसकेचा सलामीवीर उथप्पाचा सामना मुंबईचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटशी होईल. जसप्रीत बुमराह त्याची सर्वोत्तम कामगिरी करत नसल्यामुळे उनाडकटला पहिल्या सहा षटकांत अधिक प्राधान्य दिले जात आहे. उथप्पाला संयमाने उनाडकटचा सामना करावा लागेल जेणेकरून सीएसकेला चांगली सुरुवात मिळेल.