IPL 2022 Mega Auction: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा मॅचविनर सोडणार संघाची साथ, Rishabh Pant बनणार मोठे कारण; लखनौ किंवा अहमदाबाद कर्णधार पदावर नजर!
श्रेयस अय्यर (Photo Credit: Twitter/DelhiCapitals)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 चा मेगा लिलाव होणार आहे आणि त्यापूर्वी महत्त्वाच्या खेळाडूंबाबत मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला आपल्या संघात कायम ठेवणार नसल्याचे वृत्त समोर ये आहे, तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचा एक मोठा खेळाडूही संघ सोडू इच्छित आहे. दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) आता आयपीएल  (IPL) 2022 च्या मेगा लिलावाची तयारी सुरू केली आहे. अशा स्थितीत या फ्रँचायझीकडून कोणते खेळाडू कायम ठेवले जाणार आणि कोणाला टाटा बायबाय करणार याबाबत चित्र लवकरच स्पष्ट होईल. यादरम्यान दिल्ली कॅम्पमधून मोठी बातमी येत आहे की 2020 मध्ये पहिल्यांदा संघाला आयपीएल फायनलमध्ये घेऊन जाणारा श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पुढे दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसू शकतो. अय्यर कर्णधार पदावरून दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडू शकतो. श्रेयसच्या जवळच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर, तो संघाचे नेतृत्व करण्यास उत्सुक आहे आणि दिल्ली फ्रँचायझी त्याच्याकडे पुन्हा कर्णधारपद सोपवेल अशी आशा कमी आहे. रिषभ पंतच्या नेतृत्वात संघाने यंदाच्या आयपीएल प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. (IPL 2022: मुंबई इंडियन्स ‘या’ 3 तडाखेबाज खेळाडूंना करू शकते रिटेन, ‘या’ स्टार अष्टपैलूचा पत्ता कट होणे निश्चित?)

अहमदाबाद आणि लखनौ संघ आयपीएल 2022 मध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे या 2 नवीन फ्रँचायझींना एका कर्णधाराची गरज आहे. तासेच राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्जही आपले कर्णधार बदलण्याच्या मूडमध्ये आहेत. शिवाय विराट कोहलीनंतर आरसीबी देखील नव्या कर्णधाराच्या शोधात आहे, त्यामुळे श्रेयस अय्यरला पहिली पसंती मिळू शकते हेही विसरता कामा नये. आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने पंतला कर्णधार बनवले होते आणि त्याच्या नेतृत्वात संघाने प्ले-ऑफमध्ये स्थान निश्चित केले. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यरला संघापासून वेगळे व्हायचे असून अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नव्या संघांच्या कर्णधारपदावर त्याची नजर असल्याचे मानले जात आहे.

उल्लेखनीय आहे की फ्रँचायझी संघांना लिलावापूर्वी खेळाडूंच्या पूलमधून प्रत्येकी तीन क्रिकेटपटू निवडण्याची संधी मिळू शकते. सर्व संघांना समान खेळाचे क्षेत्र देण्यासाठी BCCI दोन नवीन फ्रँचायझींना (लखनौ आणि अहमदाबाद) लिलावापूर्वी उपलब्ध पूलमधून प्रत्येकी तीन खेळाडू निवडण्याची संधी देण्याचा विचार करत आहे. IPL 2021 ची UAE आवृत्ती संपल्यानंतर श्रेयस अय्यर टीम इंडियासोबत दुबईत आहे आणि टी-20 वर्ल्ड कप 2021 साठी राखीव खेळाडू आहे.