IPL 2022 Mega Auction: आयपीएल लिलावाचा आज दुसरा दिवस; पंजाब किंग्सकडे सर्वाधिक 28 कोटी शिल्लक, बाकी संघांची ही स्थिती
आयपीएल 2022 लिलाव (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022 Mega Auction: आयपीएल (IPL) मेगा लिलाव 2022 बंगळुरूमध्ये (Bangalore) आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी 74 खेळाडूंनी यशस्वी बोली लावली गेली. आयपीएल लिलावाच्या (IPL Auction) दुसऱ्या दिवशीही अनेक खेळाडूंना खरेदीदार मिळणार आहेत. भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजता लिलाव सुरू होतील. सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने प्रत्येकी 13 खेळाडू जोडले आहेत. दोन्ही संघ अजूनही 12 खेळाडूंना त्यांच्या संघात समाविष्ट करू शकतात.  आयपीएल लिलावाच्या नियमांनुसार कोणताही संघ जास्तीत जास्त 25 खेळाडू आपल्या ताफ्यात सामील करू शकतात. तसेच लिलावाच्या पहिल्या दिवसानंतर पंजाब किंग्जच्या (Punjab Kings) पर्समध्ये 28.65 कोटी रुपये आहेत तर मुंबई इंडियन्सकडे (Mumbai Indians) 27.85 कोटी रुपये शिल्लक आहेत. (IPL 2022 Mega Auction: ‘Mr IPL’ सुरेश रैना, डेविड मिलर यांच्यासह अनेक स्टार खेळाडू बोलीच्या पहिल्याच दिवशी Unsold; खरेदीदारांनी फिरवली पाठ)

पाच वेळचे आयपीएल विजेते मुंबई इंडियन्सने 15 कोटी 25 लाख रुपयांत ईशान किशनचा पुन्हा आपल्या संघात समावेश केला आहे. किशन आयपीएल लिलावाच्या इतिहासातील दुसरा सर्वात  महागडा खेळाडू ठरला आहे. याशिवाय चेन्नई सुपर किंग्सने वेगवान गोलंदाज दीपक चाहर 14 कोटी रुपये खर्च केले. अशा परिस्थितीत दुसऱ्या दिवसाचा लिलाव सुरु होण्यापूर्वी जाणून घ्या कोणत्या संघाने किती खेळाडू खरेदी केले आणि त्यांच्या पर्समध्ये किती शिल्लक आहे?

चेन्नई सुपर किंग्ज: रुतुराज गायकवाड, अंबाती रायडू, मोईन अली, एमएस धोनी, रवींद्र जडेजा, अंबाती रायडू, दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, रॉबिन उथप्पा, केएम आसिफ, तुषार देशपांडे (खेळाडू: 10, उर्वरित बजेट: 20.45 कोटी)

दिल्ली कॅपिटल्स: डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, रिषभ पंत, सरफराज खान, केएस भरत, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिच नॉर्टजे, कमलेश नागरकोटी, मुस्तफिजुर रहमान, अश्विन हेब्बर (खेळाडू खरेदी: 13, उर्वरित बजेट: 16.50 कोटी)

गुजरात टायटन्स: शुभमन गिल, जेसन रॉय, अभिनव मनोहर, हार्दिक पांड्या, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, आर साई किशोर, नूर अहमद (खेळाडू: 10, शिल्लक बजेट: 18.85 कोटी)

कोलकाता नाईट रायडर्स: व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर, शेल्डन जॅक्सन, आंद्रे रसेल, सुनील नारायण, पॅट कमिन्स, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती (खेळाडू: नऊ, उर्वरित बजेट: 12.65 कोटी)

लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल, क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, क्रुणाल पंड्या, जेसन होल्डर, रवी बिश्नोई, आवेश खान, मार्क वुड, अंकित राजपूत (खेळाडू: 11, उर्वरित बजेट: 6.90 कोटी)

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, किरोन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, एम अश्विन, बेसिल थंपी (खेळाडू: 8, उर्वरित बजेट: 27.85 कोटी)

पंजाब किंग्स: शिखर धवन, मयंक अग्रवाल, जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंह, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह, इशान पोरेल (खेळाडू: 11, उर्वरित बजेट: 28.65 कोटी)

राजस्थान रॉयल्स: देवदत्त पडिक्कल, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, प्रशांत कृष्णा, केसी करिअप्पा (खेळाडू: 11, शिल्लक बजेट: 12.15 कोटी)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज, आकाश दीप (खेळाडू: 11, उर्वरित बजेट: 9.25 कोटी)

सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विल्यमसन, निकोलस पूरन, प्रियम गर्ग, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, जे सुचित, श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी, टी नटराजन, उमरान मलिक (खेळाडू खरेदी: 13, उर्वरित बजेट: 20.15 कोटी)