IPL 2022 Mega Auction: ‘Mr IPL’ सुरेश रैना, डेविड मिलर यांच्यासह अनेक स्टार खेळाडू बोलीच्या पहिल्याच दिवशी Unsold; खरेदीदारांनी फिरवली पाठ
आयपीएल 2022 लिलाव (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022 Mega Auction Day 1 Unsold Players: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामासाठी खेळाडूंच्या लिलावाचा पहिला दिवस संपला आहे. दोन दिवस चालणाऱ्या या लिलावाच्या पहिल्या दिवशी देश-विदेशातील मोठ्या खेळाडूंवर बोली लावली गेली. भारतीय संघाचा युवा फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) आतापर्यंत लिलावातील सर्वात महागडा ठरला. पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) किशनला विक्रमी 15 कोटी 25 लाखांची बोली लावून खरेदी केले. यापूर्वी दिवसाच्या सुरुवातीला श्रेयस अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सने 12 कोटी 25 लाख रुपयांना विकत घेतले. तसेच निकोलस पूरन आणि वानिंदू हसरंगा हे आयपीएल 2022 च्या लिलावात आतापर्यंत विकले जाणारे सर्वात महागडे परदेशी खेळाडू आहेत. त्यांच्या खिशात 10.75 कोटी रुपये आले आहेत. याशिवाय आजच्या पहिल्या दिवशी टी-20 क्रिकेटमधील काही दिग्गज आणि स्टार खेळाडूंना एकही खरेदीदार मिळाला नाही. (IPL 2022 Mega Auction: मुंबई इंडियन्सने ‘या’ फलंदाजावर केला कोट्यवधींचा वर्षाव, श्रेयस अय्यरच्या पुढे जाऊन ठरला आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू)

लक्षात घ्यायचे की पहिल्या दिवसाची अनसोल्ड राहिलेले खेळाडू दुसऱ्या दिवशी पुन्हा आपले नशीब आजमावतील. आयपीएल मेगा लिलावात 2 कोटींची मूळ किंमत असलेली चार मोठी नावे विकली गेली नाहीत. मिस्टर आयपीएल म्हणून प्रसिद्ध असलेला सुरेश रैना (Suresh Raina), 38 चेंडूत आयपीएल शतक झळकावणारा डेविड मिलर (David Miller), दोन आयपीएल संघांचे कर्णधारपद भूषवणारा स्टीव्ह स्मिथ आणि बांगलादेशचा स्टार अष्टपैलू शाकिब अल हसन यांना पहिल्या दिवशी एकही खरेदीदार मिळाला नाही. आयपीएलच्या पहिल्या दिवशी खरेदीदार न मिळालेले खेळाडू खालीलप्रमाणे आहेत.

IPL 2022 महा लिलाव पहिल्या दिवसाचे अनसोल्ड खेळाडू: सुरेश रैना, इमरान ताहीर, अमित मिश्रा, अॅडम झाम्पा, मुजीब झद्रान, आदिल रशीद, उमेश यादव, सॅम बिलिंग्ज, रिद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, मोहम्मद नबी, शकीब अल हसन, स्टीव्ह स्मिथ, डेविड मिलर, रजत पाटीदार, सी हरी निशांत, मोहम्मद अझरुद्दीन, विष्णू विनोद, विष्णू सोलंकी, एन जगदीसन, एम सिद्धार्थ, संदीप लामिछाने.