IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सने कोट्यवधी रुपये देऊन केले खरेदी, आता ‘हा’ धाकड किमान 4 ते 5 सामन्यातून होणार बाहेर; जाणून घ्या कारण
डेविड वॉर्नर (Photo Credit: PTI)

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 15 वा हंगाम 26 मार्चपासून सुरु होत आहे. त्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघासाठी डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे. संघाचा तडाखेबाज सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) लीगच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळणार नसून तो आपल्या बालपणीचा हिरो शेन वॉर्नला अखेरचा निरोप (Shane Warne Funeral) देण्यासाठी मायदेशात परतणार आहे. वॉर्नरला 30 मार्च रोजी मेलबर्नमध्ये पूर्ण राजकीय सन्मानसह अंतिम निरोप दिला जाईल आणि वॉर्नरचा त्यामध्ये सहभागी होणार आहे. सध्या वॉर्नर पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. लाहोरमधील तिसऱ्या कसोटीनंतर मायदेशी जाणार असल्याचे वॉर्नरने सांगितले. तिसरी कसोटी मॅच 25 मार्च रोजी संपेल. वॉर्नरने यावर्षी ‘आयपीएल असो किंवा आयपीएल नसो, “मी अंत्यसंस्कारासाठी तिथे असेल, 100 टक्के” असे घोषित केले. (IPL 2022 Schedule Released: आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक जारी, चेन्नई सुपर किंग्ज आणि KKR यांच्यातील सामन्याने वाजणार बिगुल; पहा संपूर्ण शेड्युल)

वॉर्नर पुढे म्हणाला, “मी वॉर्नचा खेळ बघतच मोठा झालो आहे. तो माझा आदर्श राहिला आहे. मी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या शेवटच्या प्रवासात सहभागी होईन. लहानपणी मी त्याचं पोस्टर भिंतीवर लावायचो. मला शेनसारखं व्हायचं होतं. हे निश्चितच प्रत्येकासाठी अत्यंत भावनिक असणार आहे. बरेच लोक त्याचा आदर करतात.” शेन वॉर्नला (Shane Warne) 30 मार्च रोजी राजकीय सन्मानाने अखेरचा निरोप दिला जाईल, तर तर आयपीएलचा पहिला सामना 26 मार्च रोजी होणार आहे. वॉर्नर 30 मार्च रोजी वॉर्नच्या अंत्यसंस्कारात उपस्थित राहणार आहे आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निर्देशानुसार 5 एप्रिलपर्यंत मेलबर्नमध्ये राहील. तो 6 एप्रिलला मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. यानंतर बीसीसीआयच्या कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत त्याला पाच दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे, कारण तो एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊन भारतात येणार आहे. क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतर आणि कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तो दिल्ली कॅपिटल्स संघाच्या बायो-बबलमध्ये प्रवेश करेल.

दरम्यान आयपीएल 2022 मेगा ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने वॉर्नरला मोठ्या रकमेत खरेदी केले. दिल्ली फ्रँचायझीने आपल्या माजी खेळाडूसाठी 6 कोटी 25 लाख रुपये खर्च केले होते.  वॉर्नर त्यांचा मुख्य सलामी फलंदाज आहे, अशा परिस्थिती पहिल्या 5-6 सामन्यांमध्ये वॉर्नर खेळणार नसल्याची बातमी संघाच्या अडचणीत वाढ करणारी आहे. दरम्यान, थायलंडमध्ये अकाली निधन झाल्यानंतर वॉर्नचे पार्थिव एका आठवड्यानंतर ऑस्ट्रेलियात आले आहे. सुट्टीवर असताना वॉर्नला हृदयविकाराचा झटका आला. थायलंड पोलिसांनी या घटनेत कोणताही गैरप्रकार झाल्याची शक्यता नाकारली आहे.