IPL 2022 च्या मेगा लिलावात स्टार ऑस्ट्रेलियन खेळाडूंची उडी, माजी विजेता फ्रँचायझीसोबत खराब सीजननंतर नवीन सुरुवातीच्या आहे शोधत
डेविड वॉर्नर व ग्लेन मॅक्सवेल (Photo Credit: Twitter/ICC)

IPL 2022 Mega Auction: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) पुढील हंगामाचा लिलाव लवकरच होणार आहे. अहवालानुसार आयपीएल (IPL) 2022 चा लिलाव यंदा नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला आयोजित केला जाऊ शकतो. तत्पूर्वी सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार आणि दिग्गज ऑस्ट्रेलियन फलंदाज डेविड वॉर्नरने (David Warner) आज सांगितले की, आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी लिलाव प्रक्रियेत उतरणार आहे, कारण त्याला या लीगमध्ये आता नवीन सुरुवात करायची आहे. वॉर्नरने सेन रेडिओ स्टेशनला याबाबत माहिती दिली. सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) त्याच्या नेतृत्वात आयपीएल 2016 चे विजेतेपद मिळवून देणारा वॉर्नर म्हणाला, “निश्चितपणे मी माझे नाव लिलावात ठेवीन, कारण सनरायझर्स हैदराबादने पुन्हा संघात कायम ठेवण्याची मला अपेक्षा नाही. त्यामुळे पुढच्या हंगामात मी माझे नाव लिलावात ठेवेन. मला नवीन सुरुवात करायची आहे.” (IPL 2022: नवीन संघाच्या प्रवेशाने बदलणार आयपीएलचे रंग रूप; 74 सामन्यांत संघात होणार चुरशीची लढत, अधिक खेळाडू बनणार करोडपती)

IPL 2021 वॉर्नरसाठी निराशाजनक सिद्ध झाला. यंदाच्या मोसमातील भारतीय लेगमध्ये प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यापूर्वी त्याची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली. वॉर्नरला UAE मध्ये अव्वल स्थानावर सलामीच्या दोन संधी मिळाल्या परंतु ऑस्ट्रेलियन सलामीवीर त्याचा फायदा करून घेऊ शकला नाही आणि खराब फॉर्ममुळे त्याला पुन्हा वगळण्यात आले. डेविड वॉर्नर म्हणाला की त्याला का वगळण्यात आले याबद्दल त्याला स्पष्टता मिळाली नाही परंतु सांगितले गेलेले तर्क हास्यास्पद होते. केन विल्यमसनने वॉर्नरकडून कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्यावरही सनरायझर्स हैदराबादला कोणत्याही प्रकारचा फायदा झाला आणि युएई आवृत्तीत संघाला विजयासाठी संघर्ष करावा लागला. माजी चॅम्पियन्स संघ 14 सामन्यांपैकी फक्त 3 विजय मिळवून गुणतालिकेत तळाशी कायम राहिला.

दरम्यान, BCCI ने नुकतंच दोन नवीन संघांसाठी यशस्वी बोलीदारांची घोषणा केली. यामुळे IPL 2022 हे एकूण 74 सामन्यांसह 10 संघांची स्पर्धा होणार आहे. संजीव गोयंका यांच्या RPSG समुहाने तब्बल 7090 कोटींची विजयी बोली लावली आणि लखनौला घरचा आधार म्हणून निवडले. CVC Capital, Formula One चे माजी मालक यांनी 5625 कोटी रुपयांची दुसरी-सर्वोच्च बोली लावून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. उल्लेखनीय म्हणजे, RPSG समुह यापूर्वी 2016 ते 2017 दरम्यान रायझिंग पुणे सुपरजायंट फ्रँचायझी मालक होता.