Aakash Chopra on Shahrukh Khan: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आगामी 2022 लिलावात शाहरुख खान (Shahrukh Khan) सर्वात महागडा भारतीय अनकॅप्ड खेळाडू ठरेल असा विश्वास माजी भारतीय सलामीवीर आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांनी व्यक्त केला आहे. आयपीएल (IPL) 2021 मध्ये शाहरुख खानला कामगिरी चांगली करता आली नाही आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) संघासाठी तो 11 सामन्यात 21.85 च्या सरासरीने 153 धावाच करू शकला. तथापि तेव्हापासून खानने आपल्या खेळात बरीच सुधारणा केली आहे आणि उत्कृष्ट फलंदाजी करून सर्वांचे वाढेल. शाहरुख गेल्या काही वर्षांपासून भारतीय देशांतर्गत सर्किटमध्ये स्टार परफॉर्मर आहे आणि 2020-21 आणि 2021-22 या दोन्हीमध्ये तमिळनाडूला (Tamil Nadu) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली. (IND vs WI Series 2022: वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेपूर्वी टीम इंडियात तामिळनाडूच्या दोन युवा खेळाडूंची एन्ट्री, देशांतर्गत क्रिकेटमध्ये केला आहे धमाल)
आयपीएल 2022 च्या लिलावासाठी नोंदणीकृत खेळाडूंची प्राथमिक यादी जाहीर करण्यात आली तेव्हा तामिळनाडूचा कट्टर फलंदाजाच्या मूळ किमतीने अनेक चाहत्यांना थक्क केले. पंजाब किंग्जचा (पीबीकेएस) माजी खेळाडू अवघ्या 20 लाख रुपयांच्या ब्रॅकेटमध्ये होता. मात्र, दोन दिवस चालणाऱ्या या लिलावासाठी 590 खेळाडूंच्या अंतिम यादीत शाहरुखने त्याची मूळ किंमत वाढवून 40 लाख रुपये करण्यात आली आहे. 26 वर्षीय हा अनकॅप्ड खेळाडू असल्याने त्याला त्याची मूळ किंमत ठेवण्याची परवानगी असलेली कमाल मर्यादा ही आहे. चोप्रा म्हणाले, “मला वाटते फिनिशरची भूमिका सर्वात कठीण आहे कारण तुम्हाला 10-15 चेंडू खेळायला मिळतात. फिनिशर्सची यादी खूपच लहान आहे आणि जेव्हा जेव्हा अशी नावे लिलावासाठी येतात तेव्हा मला वाटते की त्यांना भरपूर पैसे मिळतील. म्हणूनच मला वाटते की शाहरुख खान आयपीएल 2022 लिलावात सर्वात महागडा अनकॅप्ड भारतीय खेळाडू असेल.”
तामिळनाडूच्या या खेळाडबद्दल बोलायचे तर शाहरुख खानने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कर्नाटकविरुद्ध अवघ्या 15 चेंडूत नाबाद 33 धावांची खेळी केली आणि शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून तामिळनाडूला विजेतेपद मिळवून दिले. दरम्यान, चोप्राने निदर्शनास आणून दिले की 26 वर्षीय शाहरुखने अद्याप मोठ्या मंचावर आपली क्षमता सिद्ध केलेली नाही. शाहरुखकडून खूप अपेक्षा असल्याचंही ते म्हणाले. क्रिकेट तज्ज्ञ म्हणाले, “तो एकमेव भारतीय शिल्लक आहे, ज्याच्याकडून तुम्ही फिनिशरची भूमिका बजावण्याची अपेक्षा करू शकता. तो हे करू शकतो की नाही आम्हाला माहित नाही, परंतु आशा आहे की जर तो हे करू शकला तर तो खूप महागड्या दराने विकला जाईल.”