Krunal Pandya याच्यासोबतच्या वादाला Deepak Hooda ने लावला ‘पूर्णविराम’, वर्षभराच्या भांडणानंतर आपल्या नात्यावर पाहा काय म्हणाला
दीपक-हुडा (Photo Credit: PTI)

Krunal Pandya-Deepak Hooda Spat: लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) अष्टपैलू खेळाडू दीपक हुडा (Deepak Hooda) याने क्रुणाल पांड्या (Krunal Pandya) सोबतचा वाद मिटवला आहे आणि तो आपला भाऊ असल्याचा दावा केला. पांड्या आणि हुडाचा वाद गेल्या वर्षी सुरु झाला जेव्हा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी बडोदा (Baroda) कॅम्पमध्ये असताना दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला होता. वादाचा परिणाम म्हणून हुडाने बडोद्याशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याऐवजी राजस्थान संघात सामील झाला. तथापि नव्याने स्थापन इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्सने अनपेक्षितपणे या दोघांना पुन्हा एकत्रीत आणले आणि अनेकांना त्यांच्या वैयक्तिक संबंधांमुळे मैदानावरील त्यांच्या कामगिरीमध्ये अडथळा निर्माण होण्याची अपेक्षा होती, परंतु तसे झाले नाही. दोन्ही खेळाडू एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटताना दिसत आहेत आणि आता हुडाने आता दावा केला आहे की, “कृणाल पांड्या माझ्या भावासारखा आहे.” (IPL Mega Auction 2022: जुन्या वादांशी तोडून नाते दीपक हुडा-कृणाल पांड्या, बटलर-अश्विन एकाच संघात; आपयीएलमध्ये काय घडणार?)

दैनिक जागरणच्या एका मुलाखतीत 26 वर्षीय अष्टपैलू खेळाडू म्हणाला, “कृणाल माझ्या भावासारखा आहे आणि भाऊ भांडतात. आम्ही एका उद्देशाने खेळत आहोत, ते म्हणजे LSG साठी सामना जिंकणे.” याशिवाय जेव्हा लखनऊने त्याला आणि क्रुणालला लिलावात विकत घेतले तेव्हा काय प्रतिक्रिया होती याबद्दल विचारले असता हुडा म्हणाला, “मी आयपीएल लिलाव पाहत नव्हतो. टीम हॉटेलमध्ये इतर खेळाडूंप्रमाणेच आम्ही भेटलो. जे काही घडले ते भूतकाळ आहे, आणि मी म्हटल्याप्रमाणे आम्ही दोघे एकाच संघासाठी खेळत आहोत आणि आमची उद्दिष्टेही सारखीच आहेत.” कृणाल आणि दीपक यांनी आपापसातील वाद मिटवून लखनऊसाठी चांगली कामगिरी केली आहे. केएल राहुलच्या नेतृत्वातील संघासाठी दोघे आतापर्यंत चांगली कामगिरी करत आहेत. हुडाने आधीच दोन अर्धशतके झळकावली आहेत, तर क्रुणालने सनरायझर्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 2 महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या.

दरम्यान, आयपीएल 2022 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवात चांगली झाली नाही. तथापि पहिल्या सामन्यात पराभव पाहिल्यानंतर संघाने विजयाचा वेग पकडला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या मोसमाच्या पहिल्या सामन्यात लखनऊला पराभवाला सामोरे जावे लागले होते, पण त्यानंतर संघाने चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या दोन्ही विजयात संघातील सर्व खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले.