IPL Mega Auction 2022: जुन्या वादांशी तोडून नाते दीपक हुडा-कृणाल पांड्या, बटलर-अश्विन एकाच संघात; आपयीएलमध्ये काय घडणार?
कृणाल पांड्या, दीपक हुडा (Photo Credit: Instagram)

IPL Mega Auction 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामासाठी खेळाडूंच्या लिलावाच्या पहिल्या दिवशी धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. पाच वेळा आयपीएल (IPL) विजेते मुंबई इंडियन्सने 15 कोटी 25 लाख रुपयात युवा भारतीय फलंदाज ईशान किशनचा पुन्हा संघात समावेश केला तर चेन्नई सुपर किंग्सने दीपक चाहरसाठी 14 कोटी रुपये मोजले. आयपीएलच्या इतिहासात जोस बटलर (Jos Buttler) आणि आर अश्विन (R Ashwin) यांच्यातील वाद कोणापासून लपलेला नाही. 2019 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना अश्विनने राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) यष्टिरक्षक-फलंदाज बटलरला मंकडींग बाद केले होते, ज्यामुळे बराच वाद झाला होता. मात्र हे दोन्ही खेळाडू आता एकाच संघासोबत खेळताना दिसणार आहेत. तसेच टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्याला (Krunal Pandya) लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) शनिवारी तब्बल 8.25 कोटी तर सुपर जायंट्सने दीपक हुडाला (Deepak Hooda) 5.75 कोटीत खरेदी केले. क्रुणाल आणि हुडा एकाच टीममध्ये आल्याने लोकांचे लक्ष वेधले. कारण गेल्या वर्षी दोघांमध्ये वाद झाला होता. (IPL 2022 Mega Auction: आयपीएल लिलावाचा आज दुसरा दिवस; पंजाब किंग्सकडे सर्वाधिक 28 कोटी शिल्लक, बाकी संघांची ही स्थिती)

अश्विन-बटलर बद्दल बोलायचे तर आयपीएलच्या 15 व्या आवृत्तीसाठी राजस्थानने ऑफ-स्पिन गोलंदाज अश्विनला 5 कोटी रुपयांमध्ये सामील करून घेतले. अश्विनची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. अश्विनला राजस्थान रॉयल्सने लिलावादरम्यान आपल्या ताफ्यात सामील केले आणि सर्वांचा आश्चर्याचा धक्का बसला. आयपीएल 2019 दरम्यान अश्विनने बटलरला ‘मँकाडिंग’ केले होते. या घटनेनंतर जेव्हा-जेव्हा हे दोन खेळाडू मैदानावर एकमेकांच्या विरोधात आले तेव्हा चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचायची. दुसरीकडे, गेल्या वर्षी जानेवारीमध्ये क्रुणाल पांड्या आणि दीपक हुडा यांच्यातील वाद देशांतर्गत टूर्नामेंट सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेपूर्वी समोर आला होता.

रिपोर्ट्सनुसार, दीपक हुडाने त्या वादनंतर यांनी बडोदा क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहून पांड्या विरोधात तक्रार केली होती. याशिवाय हुडाने पांड्याला शिवीगाळ, गैरव्यवहार आणि करिअर संपवण्याची धमकी देण्याचे देखील म्हटले होते. तेव्हा हे प्रकरण खूप चर्चेत होते. दोन्ही खेळाडूंनी एकमेकांवर भांडणे, शिवीगाळ करणे असे गंभीर आरोप केले होते. मात्र, आता हे दोन्ही खेळाडू एकाच संघात खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे येत्या आयपीएल हंगामात या चारही खेळही खेळाडूंना एकमेकांसोबत खेळताना पाहणे चाहत्यांसाठी नक्कीच उत्साहाचे ठरणार आहे.