चेतन सकरिया (Photo Credit: Twitter)

IPL 2021 Suspended: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) युवा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया (Chetan Sakariya) जेव्हा गुजरातमधील (Gujarat) भागानगर जिल्ह्यातील वर्तेज येथे आपल्या घरी आला तेव्हा तो त्वरित रुग्णालयात धावला जिथे त्याचे वडील कांजीभाई (Kanjibhai) जे कोविड-19 (COVID-19) पॉझिटिव्ह असून दाखल झाले आहे. सकारिया मागील आठवड्यात वडील कोविड-19 पॉझिटिव्ह असून त्यांना रुग्णालयात दाखल केले असल्याचे समजले होते. 23 वर्षीय चेतन सकारियाने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, “मी भाग्यवान आहे कारण काही दिवसांपूर्वी राजस्थान रॉयल्सकडून माझा वाटा मिळाला होता. मी ताबडतोब पैसे घरी पाठवले आणि ज्यामुळे माझ्या वडिलांना सर्वात मोठ्या काळात मदत झाली.” आयपीएल (IPL) 2021 बायो-बबलमध्ये कोविड-19 पॉझिटिव्ह प्रकरणे आढळल्यानंतर टी-20 लीग अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. या निर्णयानंतर भारतीय आणि परदेशी क्रिकेटपटू आपापल्या घरी परतण्याच्या मार्गावर आहेत. (IPL 2021: छोटा पॅकेट मोठा धमाका! 20 लाखात फ्रँचायझींने दिली संधी, पण कोट्यवधींची कामगिरी करत ‘हे’ 3 युवा रातोरात बनले आयपीएल स्टार)

सकारिया याच्यासारख्या देशांतर्गत खेळाडू, अनकॅप्ड आणि केन्द्रीय कराराशिवाय असलेल्या खेळाडूंना आयपीएलमुळे मोठी आर्थिक मदत मिळते. आयपीएल 2021 मध्ये चेतन साकारियाला राजस्थान रॉयल्सने 1.20 कोटी रुपयांत खरेदी केले होते. सकारिया म्हणाला , “लोक म्हणाले की आयपीएल थांबवा. मला त्यांना काहीतरी सांगायचे आहे. माझ्या कुटुंबातील मी एकटाच कमावणारा आहे. क्रिकेट हे माझ्या कमाईचे एकमेव स्त्रोत आहे. आयपीएलमधून मिळणाऱ्या मिळकतीतून माझ्या वडिलांसाठी चांगले उपचार करण्यास मी सक्षम आहे. ही स्पर्धा महिनाभर घडली नसती तर मला अवघड गेलं असतं. मी एका गरीब कुटुंबातून आलो आहे. माझ्या वडिलांनी आयुष्यभर टेम्पो चालवला असून आयपीएलमुळे माझे संपूर्ण आयुष्य बदलले आहे.” घरी पोहोचल्यानंतर चेतन सकारिया नियमितपणे रुग्णालयाचे चक्कर मारत आहे.

दुसरीकडे, सकारियाने आयपीएलमध्ये जोरदारपणे प्रभावित केले. त्याने 7 विकेट्स घेतल्या आणि म्हणाला की तो नवीन बॉलने संघासाठी पहिला पर्याय असेल याची कल्पनाही केली नव्हती. शिवाय, आयपीएलचा उर्वरित हंगाम लवकरच होईल अशी आशा सकारियाने व्यक्त केली. प्रसिद्धीशिवाय पैसे मिळवण्याने सकारिया व कुटुंबाचे आयुष्य बदलले आहे.