हर्षल पटेल आणि हरप्रीत ब्रार (Photo Credit: PTI)

IPL 2021: आयपीएलच्या (IPL) 29 सामन्यानंतर अखेर कोरोना व्हायरसमुळे टी-20 लीगवर ब्रेक लागला जेव्हा बायो-बबलमध्ये खेळाडू कोविड-19 (COVID19) पॉझिटिव्ह आढळल्यावर बीसीसीआयने 2021 अनिश्चित काळासाठी स्थगित केलं. इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) अर्ध्या हंगामादरम्यान दरवर्षीप्रमाणे प्रसिद्ध खेळाडूंनी प्रभावित केले तर काहींनी मात्र आपल्या खेळीने चाहत्यांची निराशा केली. यादरम्यान, युवा खेळाडूंनी देखील संघात मोलाचे योगदान दिले. विशेषतः असे खेळाडू ज्यांच्यावर फ्रँचायझीने अधिक रस न दाखवत लिलावात त्यांना अवघ्या 20 लाखांच्या त्यांच्या बेस प्राईसवर खरेदी केले. आपल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर रातोरात स्टार बनलेल्या या युवा खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे आहेत. (IPL 2021 Suspended: आयपीएल 14 स्थगित केल्याने ‘या’ 3 संघांना झाला सर्वाधिक फायदा, घेतला असेल सुटकेचा नि:श्वास)

हर्षल पटेल (Harshal Patel)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून यंदाचं आयपीएल गाजवणाऱ्या पटेलला फ्रँचायझीने 20 लाख रुपयात खरेदी केले होते. पटेल यंदाच्या आरसीबीच्या प्रभावी कामगिरीचं मुख्य आकर्षण ठरला. मुंबई इंडियन्सविरुद्ध पाच विकेट घेण्यापासून स्पर्धा स्थगित करेपर्यंत तो पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता. आयपीएल 14 मध्ये खेळलेल्या 7 सामन्यात त्याने 17 विकेट्स घेतल्या आहेत.

हरप्रीत ब्रार (Harpreet Brar)

सर्वात अंडररेटेड क्रिकेटपटूंपैकी एक हरप्रीत ब्रारने त्याला दिलेल्या संधींपेक्षा सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. पंजाब किंग्सने स्पर्धेच्या सुरुवातीच्या काळात त्याला बाहेर ठेवण्यात आले आणि आयपीएल 2021 मध्ये त्याने फक्त दोन सामने खेळले. आरसीबीविरुद्ध सामन्यासाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आणि केएल राहुलबरोबर त्याने महत्त्वपूर्ण भागीदारी करत पंजाबला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. तो 17 चेंडूत 25 धावा करून नाबाद राहिला आणि आपला आत्मविश्वास त्याने आरसीबीच्या फलंदाजांविरुद्ध कायम ठेवत विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्सना बाद करत संघाच्या विजयाचा नायक ठरला.

देवदत्त पडिक्क्ल (Devdutt Padikkal)

मागील वर्षी आरसीबीने आयपीएल प्लेऑफ गाठणे आणि यंदाच्या शानदार कामगिरी पुन्हा एकदा कर्नाटकच्या पडिक्क्लने मुख्य भूमिका बजावली. पडीक्कलने आयपीएल 2020 मध्ये बेंगलोर संघासाठी 20 लाखात पदार्पण करत आतापर्यंत 18 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 610 धावा केल्या आहेत. यंदाच्या हंगामात लय मिळवण्यात त्याला थोडा कालावधी लागला पण फॉर्म पुन्हा मिळवत त्याने दणदणीत बॅटिंग प्रदर्शन केले. पडिक्क्लने 6 सामन्यात 195 धावा केल्या ज्यामध्ये एका शतकाचाही समावेश होता.