हर्षल पटेल आयपीएल हॅटट्रिक (Photo Credit: PTI)

IPL 2021, RCB vs MI: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या युएई (UAE) आवृत्तीत गतविजेता मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Chalengers Bangalore) 54 धावांनी जोरदार विजय मिळवला आहे. आरसीबीने (RCB) दिलेल्या 166 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स 18.1 ओव्हरमध्ये 111 धावाच करू शकली. या सामन्यात आरसीबीचा पर्पल कॅप धारक वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने (Harshal Patel) शानदार हॅटट्रिक घेतली. या पराभवासह बेंगलोरची गाडी रुळावर परतली आहे तर मुंबईच्या प्लेऑफ फेरी गाठण्याच्या आशेला मोठा धक्का बसला आहे. मुंबईसाठी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) 43 धावा केल्या. तसेच क्विंटन डी कॉकने 24 धावांचे योगदान दिले. याशिवाय अन्य फलंदाज दहाचा आकडा देखील स्पर्श करू शकले नाही. दुसरीकडे, आरसीबीने पहिले बॅट व अखेरीस फिल्डिंग व गोलंदाजीने पाच वेळा आयपीएल विजेत्यांवर एकहाती वर्चस्व गाजवले. रॉयल चॅलेंजर्ससाठी पटेलने हॅटट्रिक एकूण चार विकेट घेतल्या. तसेच युजवेंद्र चहलने 3 विकेट घेतल्या. तर ग्लेन मॅक्सवेलने दोन आणि मोहम्मद सिराजने 1 गडी बाद केले. (Virat Kohli Scripts History: विराट कोहली बनला ‘दस हजारी मनसबदार’, दिग्गजांच्या यादीत प्रवेश करणारा बनला पहिला भारतीय फलंदाज)

बेंगलोरने दिलेल्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित आणि क्विंटन डी कॉकच्या सलामी जोडीने मुंबईला जबरदस्त सुरुवात करून दिली. दोघांनी पॉवर-प्लेचा भरपूर फायदा करून घेत चौकार-षटकार खेचले. मात्र पावरप्ले संपताच अनुभवी चहलने आक्रमक फलंदाजी करणाऱ्या डी कॉकला बाद करत मुंबईला पहिला झटका दिला. डी कॉक बाद होताच काही वेळात रोहितही माघारी परतला. मॅक्सवेल्च्या चेंडूवर देवदत्त पडीक्कलने त्याचा बाउंड्री लाईनवर त्याचा सोपा झेल पकडला. युवा फलंदाज ईशान किशन आणि अष्टपैलू कृणाल पांड्या पुन्हा एकदा बॅटने प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. किशन 12 चेंडूत 9 धावा तर कृणाल 11 चेंडूत 5 धावाच करू शकला. या दोघांपाठोपाठ खराब शॉट खेळत सूर्यकुमार यादवही स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतला. किरोन पोलार्ड व दुखापतीतून कमबॅक करणारा हार्दिक पंड्या पुन्हा एकदा आपला दम दाखवून संघाला विजय मिळवून देतील अशा अनेकांना आशा होत्या पण त्या दोघांनी देखील निराशा केली. पोलार्ड 7 धावा तर तसेच हार्दिक 5 धावा करून परतला.

यापूर्वी नाणेफेक जिंकून रोहितने गोलंदाजी घेतली. पण आरसीबी खेळाडूंच्या धमाकेदार फलंदाजीने मुंबईला त्यांचा निर्णय़ चुकला वाटत असताना अखेरच्या षटकात गोलंदाजांनी शिष्ठबद्ध गोलंदाजी करून आरसीबीला 165 धावांवर रोखलं. आरसीबीकडून मॅक्सवेलने सर्वाधिक 56 धावा केल्या तर विराट कोहलीने 51 धावा केल्या. तसेच मुंबईसाठी जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.