IPL 2021, RCB vs MI: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या 39 व्या सामन्यात विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्या घमासान रंगणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. सध्याचा भारतीय कर्णधार कोहली आणि आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर राष्ट्रीय संघाची सूत्रे हाती घेण्याचा प्रबळ दावेदार रोहितच्या संघांना मागील सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएल (IPL) 14 ची युएई आवृत्ती सुरु झाल्यापासून दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच दोन्ही संघासाठी हा सामना महत्वपूर्ण यामुळे देखील आहे कारण सामन्यातील विजय त्यांच्या प्लेऑफ गाठण्याच्या आशा पल्लवित ठेवतील. आरसीबी (RCB) सध्या नऊ सामन्यांतून 10 गुणांसह पहिल्या तिसऱ्या स्थानावर आहे, तर सलग दोन पराभवांनंतर मुंबई नऊ सामन्यांतून आठ गुणांसह पाचव्या स्थानावर घसरली आहे. अशा स्थितीत या निर्णायक सामन्यात दोन्ही संघातील भारतीय खेळाडूंवर सर्वांची नजर असेल. (IPL 2021: चेन्नई विरुद्धचा सामना हरल्यानंतर विराट कोहलीने ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूवर नाराजी केली व्यक्त, पाहा व्हिडिओ)
विराट कोहली (Virat Kohli)
विराटसाठी यंदाचा आयपीएल सीजन रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार म्हणून अखेरचा असणार आहे. युएई टप्प्याच्या सुरुवातीपूर्वीच विराटने आरसीबीच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. याशिवाय, विराटने चेन्नईविरुद्ध झंझावाती अर्धशतक ठोकले असले तरी तो गेल्या काही सामान्यांपासून धावांची संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून आपल्या अंतिम आयपीएलमध्ये विराट नक्कीच एक फलंदाज म्हणून ठसा उमटवण्याच्या प्रयत्नात असेल. याशिवाय, टी-20 वर्ल्ड कपपूर्वी विराटाचे लयीत परतणे देखील भारतासाठी आनंदजी बाब असेल.
रोहित शर्मा (Rohit Sharma)
विराटप्रमाणे रोहित देखील धावांची संघर्ष करत आहेत. रोहितने यंदाच्या मोसमात फक्त एकच अर्धशतक केले आहेत. तसेच दुखापतीतून पुनरागमन करणारा रोहित वैयक्तिक मोठी धावसंख्या करण्यासाठी झगडत आहे. शिवाय, मुंबई इंडियन्सला प्लेऑफ फेरी गाठण्यासाठी रोहितने सलामीला धावा करणे गरजेचे आहे. मुंबईचा आयपीएल प्लेऑफचा मार्ग सध्या खडतर आहे. त्यामुळे रोहितची सलामीची भूमिका आरसीबी विरोधात निर्णायक ठरेल.
ईशान किशन (Ishan Kishan)
रोहितच्या पलटनच्या विश्वासार्ह खेळाडूंपैकी एक ईशानचा फॉर्म सध्या चिंतेचा विषय बनला आहे. ईशान किशनला उत्तरार्धातील दोन सामन्यांमध्ये केवळ 25 धावा करता आल्या आहेत. आयपीएल 2021 च्या पूर्वार्धात इशान किशनने 5 सामन्यांमध्ये 73 धावा केल्या. डावखुरा फलंदाज किशनचा फॉर्म निःसंशयपणे पहिल्या हाफमध्ये देखील चिंताजनक होता. मात्र स्पर्धेचा शेवट जवळ येत असताना किशनला आता लयीत परतणे गरजेचे आहे.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)
ईशानप्रमाणे सूर्यकुमार यादवची बॅटिंगने देखील मुंबईची चिंता वाढवली आहे. पण सूर्यकुमार यादवची स्थिती तर आणखी वाईट बनली आहे. सूर्याला उत्तरार्धातील दोन सामन्यांमध्ये दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही. आणि, फक्त 8 धावा केल्या. सूर्य कुमार यादवने आयपीएल 2021 च्या पूर्वार्धात खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये 173 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता आरसीबीविरुद्ध यादवच्या खेळीवर सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.
हार्दिक पांड्या (Hardik Pandya)
मुंबईचा तडाखेबाज अष्टपैलू हार्दिकच्या फिटनेस सध्या चाहत्यांमध्ये चाहत्यांसह विशेषग्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. युएई येथे सराव करताना हार्दिकला दुखापत झाली होती. त्यानंतर चेन्नई आणि कोलकाताविरुद्ध सामन्यासाठी त्याला विश्रांती देण्यात आली होती. अशा स्थितीत हार्दिक मैदानात उतरतो की नाही आणि उतरल्यास त्याच्या खेळीवर सर्वांची नजर असेल.