IPL 2021, RCB vs DC: दुबई येथे नुकत्याच संपुष्टात आलेल्या इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 14 च्या अंतिम साखळी सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सने (Royal Challengers Bangalore) रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) विकेटने दणदणीत विजय मिळवला. दिल्लीने दिलेल्या 165 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात बेंगलोरने केएस भरत (KL Bharat) आणि ग्लेन मॅक्सवेलच्या (Glenn Maxwell) संयमी अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित ओव्हरमध्ये लक्ष्य साध्य केले. अंतिम चेंडूवर सहा धावांची गरज असताना भरतने उत्तुंग षटकार खेचला आणि आरसीबीच्या (RCB) पारड्यात आयपीएल (IPL) इतिहासातील 100 वा विजय पाडला. परिणामी विराट ‘आर्मी’विरुद्ध दिल्लीला पराभव पत्करावा लागला. बेंगलोरसाठी भरतने सर्वाधिक 78 नाबाद धावा केल्या. तर ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 51 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, दिल्लीसाठी एनरिच नॉर्टजेने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर अक्षर पटेलने एक गाडी बाद केला.
शुक्रावारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात 55वा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील 56वा सामना एकाचवेळी सुरु झाला. दिल्लीने पहिले फलंदाजी करून दिलेल्या 165 धावांचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात खराब झाली. नॉर्टजेने पहिल्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर देवदत्त पडिक्क्लला बाद करून रॉयल चॅलेंजर्सना पहिला झटका दिला. पडिक्क्ल या सामन्यात भोपळा न फोडता माघारी परतला. त्यानंतर नॉर्टजेने आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आरसीबी कर्णधार विराट कोहलीचा अडथळा दूर केला. विराट आज 8 चेंडूत 4 धावाच करू शकला. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यावर आज अनुभवी फलंदाजी एबी डिव्हिलियर्सला फलंदाजी क्रमात बढती मिळाली. ज्याचा त्याने अधिक नाही फायदा घेऊ शकला नाही. आरसीबीने अर्धशतकी धावसंख्या ओलांडली असताना पटेलच्या फिरकीत अडकून डिव्हिलियर्स 26 धावांवर बाउंड्री लाईनवर झेलबाद झाला. तथापि नंतर भरतने मॅक्सवेलला साथीला घेत शतकी भागीदारी करून संघाला विजयीरेष ओलांडून दिली. दरम्यान, आयपीएलच्या अंतिम लीग सामन्यात विजय मिळवून आरसीबीने गुणतालिकेत आपला तिसरा क्रमांक कायम ठेवला आहे. तर रिषभ पंतचा दिल्ली संघ पहिल्या स्थानावर विराजमान आहे. अशा स्थितीत आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीचा सामना चेन्नई सुपर किंग्सशी होईल.
बेंगलोर विरुद्ध दिल्ली सामन्यात बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन ज्याप्रकारे सुरुवातीला फलंदाजी करत होते तो अयोग्य वाटला पण अंतिम क्षणी गोलंदाजांनी त्यांना सामन्यात करून दिले. शॉ आणि धवनमध्ये पहिल्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी झाली. शिखर 43 धावांवर त्याच्यापाठोपाठ शॉ 48 धावांवर बाद झाला. शिमरॉन हेटमायर आणि श्रेयस अय्यरने संघाचा डाव सावरला. शिखर 43 धावांवर त्याच्यापाठोपाठ शॉ 48 धावांवर बाद झाला. हेटमायरने काही मोठे फटके खेळून संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. पण बेंगलोरच्या फलंदाजांपुढे तो निरर्थक ठरली.