बेन स्टोक्स (Photo Credit: Instagram)

IPL 2021: राजस्थान रॉयल्ससाठी (Rajasthan Royals) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 काही खास सिद्ध झाले नाही. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही, मात्र रॉयल्सने शारजाहमध्ये (Sharjah) 2 विजयांसह आपल्या मोहिमेची सुरुवात केली. क्वारंटाइन नियमांमुळे बेन स्टोक्स (Ben Stokes) राजस्थान संघासाठी सलामीचे काही सामने खेळू शकला नाही. त्याने 14 पैकी फक्त 8 सामने खेळले आणि त्याने मोठी छाप पाडली. मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) सामन्यात त्याने 60 चेंडूत 107 धावा ठोकल्या ज्यात 14 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. स्टोक्स सध्याच्या जागतिक क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असून त्याने सर्व फॉरमॅट क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. बॅट आणि बॉलशिवाय त्याने आपल्या संघासाठी काही अविश्वसनीय झेल पकडले आहेत. रॉयल्सने त्याला आयपीएल 2021 साठी रिटेन केलं, पण मुंबई इंडियन्सच्या एका चाहत्याने पुढच्या सत्रापूर्वी राजस्थानला स्टोक्सची मुंबईमध्ये ट्रेडिंग करण्याची इच्छा व्यक्त केली ज्यावर संघाने मजेदार प्रतिक्रिया दिली. (IPL 2021: राजस्थान रॉयल्सच्या संघाने कुमार संगकारा याच्यावर सोपवली मोठी जबाबदारी)

मुंबई-आधारित फ्रँचायझीमध्ये कीरोन पोलार्ड, क्रुणाल आणि हार्दिक पांड्या यासारखे अष्टपैलू विभागातील काही मॅच-विजेते आहेत. तरीही, चाहत्याने रॉयल्सला गेतविजेत्या चॅम्पियन्स संघाबरोबर स्टोक्सचा व्यापार करण्याचा सल्ला दिला. आणि रॉयल्सच्या सोशल मीडिया अ‍ॅडमिनने चाहत्याच्या विनंतीवर मजेदार GIF द्वारे प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, रॉयल्सने 14व्या आयपीएलच्या लिलावापूर्वी कर्णधार स्टीव्ह स्मिथला संघाबाहेरचा रस्ता दाखवला. स्मिथनंतर आता स्टोक्स राजस्थान रॉयल्स संघातील सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू ठरला आहे. नमूद केल्याप्रमाणे, स्टोक्स सध्या आघाडीच्या अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध रिव्हर्स लीग सामन्यात रॉयल्सकडून शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. मात्र, दुर्दैवाने जयपूर-आधारित फ्रँचायझीला स्पर्धे अखेरीस गुणतालिकेत स्थानावर स्थानावर समाधान मानावे लागले. स्टोक्सने त्याच्या पहिल्या आयपीएल हंगामात राइजिंग पुणे सुपरजायंटचे प्रतिनिधित्व केले होते. पुणे आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर राजस्थान रॉयल्सने स्टोक्सशी करार केला. मात्र, मागील हंगामात तो आपल्या फॉर्मची पुनरावृत्ती करू शकला नाही.