Kumar Sangakkara (Photo Credit: Rajasthan Royals)

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) चौदाव्या हंगामापूर्वी राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी संघाने (Rajasthan Royals) श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर कुमार संगकारावर (Kumar Sangakkara) मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कुमार संगकारा हा आता राजस्थान रॉयल्स संघाचा क्रिकेट संचालक असणार आहे. राजस्थान रॉयल्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे या बाबत माहिती दिली आहे. राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएलचा 13 वा हंगाम फारसा चांगला गेला नव्हता. या हंगामात राजस्थानचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत तळाशी होता.

आयपीएलच्या 14 व्या हंगामातील मिनी लिलाव फेब्रुवारीमध्ये होणार आहे. यापूर्वी, सर्व फ्रँचायझी संघांनी आपल्या मुक्त व राखीव खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. राजस्थान रॉयल्सबद्दल बोलताना संघाने यावेळी कर्णधार स्टीव्ह स्मिथला मुक्त केले आहे. हे देखील वाचा- Big Bash League 2020-21: अरेरे! एकच चेंडूवर नाट्यमय पद्धतीने दोनदा रनआऊट झाला फलंदाज, पहा हा मजेदार व्हिडिओ

ट्विट-

आयपीएलचा पहिला हंगामात 2008 मध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने विजेतेपद जिंकले होते. दरम्यान, राजस्थानच्या संघाने आयपीएलच्या पुढील हंगामासाठी संजू सॅमसन (कर्णधार), बेन स्टोक्स, झोफ्रा आर्चर, जोस बटलर, रायन पराग, श्रेयस गोपाळ, राहुल तेवतिया, महिपाल लोमरर, कार्तिक त्यागी, अँड्र्यू टाय, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, यशस्वा जयस्वाल, अनुज रावत, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, रॉबिन उथप्पा यांना राखीव ठेवले आहे. तर, स्टीव्ह स्मिथ, अंकित राजपूत, ओशाणे थॉमस, आकाश सिंग, वरुण आरोन, टॉम करन, अनिरुद्ध जोशी, शशांक सिंह या खेळाडूंना मुक्त करण्यात आले आहे.