IPL 2021 Auction: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या लिलावात गतविजेत्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) संघात अधिक बदल न करता 7 नवीन खेळाडूंचा समावेश केला आहे. यामध्ये अष्टपैलू नॅथन कोल्टर-नाईल, वेगवान गोलंदाज अॅडम मिल्ने, लेगस्पिनर पीयूष चावला, अष्टपैलू जेम्स नीशम, युधवीर चरक, मार्को जानसेन आणि अर्जुन तेंडुलकरचा समावेश आहे. मुंबई संघात या खेळाडूंच्या आगमनाने संघाला आणखी बळकटी दिली आहे. लसिथ मलिंगाच्या आयपीएलमधून निवृत्तीनंतर संघाला एका अनुभवी वेगवान गोलंदाजाची आवश्यकता होतीजी ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराहला साथ देईल, शिवाय, पीयूष चावलाच्या संघात समावेश झाल्याने टीमला अनुभवी फिरकीपटूही मिळाला. संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील लिलावात फ्रँचायझीने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे खूप आनंद झाला. शर्माने ट्विटरवर पोस्ट शेअर करत लिहिले की, "आतापर्यंत उत्तम काम, पल्टन." (Mumbai Indians IPL 2021 Squad: सहाव्या आयपीएल जेतेपदासाठी रोहित शर्माची पलटन सज्ज, पहा MI चा संपूर्ण संघ)
मुंबईने आपल्या गोटात लिलावात एकूण न्यूझीलंड 2, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी 1 आणि भारताचे 3 खेळाडू खरेदी केले. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणजे मुंबई इंडियन्समी सर्वाधिक 5 वेळा आयपीएल विजेतेपदाचा मान मिळवला आहे. आणि आगामी हंगामात आता त्याने लक्ष सहाव्या विजेतेपदावर असेल. आयपीएलच्या 13व्या हंगामाच्या फायनल सामन्यात रोहितच्या मुंबई इंडियन्सने श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्सचा एकतर्फी सामन्यात सहज पराभव करत विजेतेपद पटकावले होते. रोहितच्या नेतृत्वात मुंबई संघाने आजवर सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. रोहितने स्वतः देखील बॅट आणि आपल्या नेतृत्वाने पुढाकार घेत संघाचे नेतृत्व केले आहेत तर, त्याने देशाच्या या प्रतिष्ठित स्पर्धेत आतापर्यंत 200 सामन्यात 31.3 च्या सरासरीने 5230 धावा केल्या आहेत.
View this post on Instagram
लक्षात घेण्यासारखे म्हणजे, मुंबईने सर्व पाच विजेतेपद रोहितच्या नेतृत्वात जिंकले आहे. त्याहूनही आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे 2013 मध्ये रोहितने मुंबई इंडियन्स संघाच्या नेतृत्वातची जबाबदारी घेतली असून त्याने आठ मोसमांपैकी त्याने पाचमध्ये संघाला विजेतेपद जिंकवून दिले आहेत. त्याने आयपीएलमध्ये एक शतक आणि 39 अर्धशतके नोंदविली असून गोलंदाजीत समान सामन्यांच्या 30 डावांमध्ये त्याने 15 विकेट्स घेतल्या आहेत.