IPL 2021: आयपीएल गमावणे हे देखील वाईटातून चांगले घडल्यासारखेच- Marnus Labuschagne
मार्नस लाबूशेन (Photo Credit: Getty Images)

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लाबूशेनला (Marnus Labuschagne) एकही  खरेदीदार मिळाला नाही. जगातील सर्वाधिक लोकप्रिय टी-20 लीगमध्ये लाबूशेनला एकाही सामन्यात सहभाग घेता आला नव्हता पण यंदा त्याला फ्रँचायझी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र तो लिलावात अखेरपर्यंत अनसोल्ड राहिला. आणि भारतातील कोरोना व्हायरस (India Coronavirus) परिस्थिती वाईट पासून धोकादायक बनली आहे. आणि या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलची (IPL) 2021 आवृत्ती होत आहे. भारतातील सध्याच्या परिस्थितीबद्दल लाबूशेनने उघडपणे आपले मत मांडले आहे. लाबूशेनने सध्या सुरू असलेल्या लीगमध्येआपल्या देशातील खेळाडूंच्या सहभागाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. (IPL 2021: कोरोनाच्या कारणामुळे खेळांडूनंतर आता अंपायर यांची सुद्धा टूर्नामेंटमधून माघार)

“हे निश्चितपणे (आयपीएलमध्ये गमावणे) वाईटातून चांगलं होण्यासारखे दिसत आहे,” लाबूशेनने 'PA Media'ला सांगितले. “मला आयपीएलमध्ये खेळायला आवडेल, ही एक उत्तम स्पर्धा आहे. परंतु नाण्याला नेहमीच दोन बाजू असतात. जर मी आयपीएलमध्ये असतो तर मी दूर गेलो असतो आणि शेफील्ड शिल्ड स्पर्धा जिंकणे ही एक गोष्ट आहे जी बहुतेक वेळा येत नाही. दुसरे म्हणजे, तुम्ही आता भारतातील परिस्थिती पहा आणि ती चांगली दिसत नाही,” काउन्टी क्रिकेट क्लब ग्लॅमरगॉनशी संबंधित असलेल्या लाबूशेनने पुढे म्हटले. कोरोना व्हायरस महामारीच्या दुसर्‍या लाटेने भारतात कहर केला आहे. मागील काही दिवसात दररोज 3 लाखाहून अधिक प्रकरणांची नोंद करण्यात आली आहेत. हे सर्व काही गंभीर औषधे आणि ऑक्सिजन पुरवठ्यांच्या कमतरतेमुळे निर्माण झाली आहे. शिवाय, भारतात कोविड प्रकरणात वाढ झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया सरकारने 15 मे पर्यंत सर्व थेट प्रवासी उड्डाणे रद्द केली आहेत.

आयपीएल लीगचे सामने 23 मे रोजी संपुष्टात येतील. यानंतर, क्वालिफायर्स (25 मे, 28) आणि एलिमिनेटर (26 मे) आणि फायनल (30 मे) - हे सर्व अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केले जाणार आहे. त्यांच्याच देशाबाहेर लॉकडाऊन होण्याच्या भीतीपोटी गोलंदाज अ‍ॅन्ड्र्यू टाय, केन रिचर्डसन आणि अ‍ॅडम झांपा यांनी आयपीएलमधून माघार घेतली आहे.